Team India नं मैदान गाजवलं; नारी शक्तीनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला लोळवलं!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघात ट्वेंटी-20 मालिका खेळवली जात आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या मालिकेतील पहिला सामना जिंकून यजमान भारतीय संघाने विजयी सलामी दिली. टीम इंडियाने वन डे मालिकेतील दारूण पराभवानंतर जोरदार पुनरागमन केले अन् पहिल्या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि 9 विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. कांगारूंचा संघ भारतीय गोलंदाजांसमोर नतमस्तक झाल्याचे दिसले. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकांत 141 धावा केल्या होत्या. भारताने हे लक्ष्य 1 विकेट गमावून पूर्ण केले. टीम इंडियाकडून शेफाली वर्माने सर्वाधिक नाबाद (64) आणि स्मृती मानधनाने (54) धावा केल्या.

Team India ची सांघिक खेळी

प्रथम गोलंदाजी करताना भारताकडून तितस साधूने अप्रतिम कामिगिरी केली. याशिवाय वन डे मालिकेत झालेल्या चुंकामधून धडा घेत संघाने क्षेत्ररक्षणात चमक दाखवली. कर्णधार हरमनप्रीत कौरने पाच झेल घेऊन वन डे मालिकेतील खराब क्षेत्ररक्षणावर पडदा टाकला. कारण भारतीय संघाला खराब क्षेत्ररक्षणाचा मोठा फटका बसला होता.

Team India चा दबदबा

बलाढ्य ऑस्ट्रेलियाची सुरुवात खूपच खराब झाली होती आणि 4 फलंदाज केवळ 33 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले होते. ऑस्ट्रेलियाकडून फोबी लिचफिल्डने सर्वाधिक (49) धावा केल्या. तिने 4 चौकार आणि 3 षटकार मारले. तर, एलिसे पेरीने 30 चेंडूत 37 धावा केल्या. भारताकडून तितस साधूने सर्वाधिक 4 बळी घेतले. याशिवाय श्रेयांका पाटील आणि दीप्ती शर्मा यांना 2-2 बळी घेण्यात यश आले.

दरम्यान, भारताच्या तितस साधूने आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले. तिने 4 षटकात केवळ 17 धावा देत 4 बळी घेण्याची किमया साधली. ट्वेंटी-20 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करणारी साधू ही दुसरी भारतीय महिला गोलंदाज ठरली आहे. या आधी माजी खेळाडू झुलन गोस्वामीने 2012 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 धावांत 5 बळी घेतले होते.

Team India चा मोठा विजय

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 142 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शानदार सुरूवात केली. सलामीवीर शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या बळीसाठी 137 धावांची भागीदारी नोंदवली. स्मृती 54 धावांवर बाद झाली पण शेफाली अखेरपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिली. जेमिमा रॉड्रिग्जने विजयाचा चौकार मारून संघाला आघाडी मिळवून दिली. भारताने 17.4 षटकात 145 धावा करून हे लक्ष्य गाठले.

Deepika Padukone | ‘ओम शांती ओम’ नाही तर ‘हा’ होता दीपिकाचा पहिला चित्रपट

Aishwarya Rai | ‘…म्हणून मी गप्प आहे’; अभिषेक बच्चनने केला मोठा खुलासा

MS Dhoni | IPL पूर्वीच धोनीला मोठा धक्का, जवळच्याच मित्राने केला घात; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मृत्यूनंतर Sharad Mohol चं राजकीय कनेक्शन समोर!

Manoj Bajpayee ची राजकारणात एंट्री?; म्हणाला, ‘200 टक्के खात्री…’