Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी!; 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Online Payment l आजकाल भाजीवाल्यांपासून ते मोठे उदयोगपती सर्वचजण ऑनलाईन पेमेंट करण्यावर भर देतात. कारण सध्या डिजिटल युग चालू आहे. डिजिटल युगात व्यवहार प्रचंड वेगाने वाढत आहेत. त्यामुळे ग्राहक सध्याच्या ऑनलाइन युगात Phone pay, Google pay आणि Paytem यांसारख्या युपीआय आयडीचा वापर जास्त प्रमाणात करतात. मात्र केंद्र सरकार युपीआय पेमेंटच्या नियमात गैरव्यवहार होऊ नये म्हणून नेहमीच बदल करत असतात. अशातच आता केंद्र सरकारने ग्राहकांना युपीआय पेमेंट संदर्भात दिलासा दिलासा दिला आहे.

Online Payment l 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट करता येणार

ऑनलाईन पेमेंटची सेवा सुसज्ज करण्यासाठी केंद्र सरकारने एका दिवसात 1 लाख रुपयांपेक्षा जास्त व्यवहारांवर बंदी घातली होती. मात्र आता पुन्हा नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मदतीने एक उपाय शोधून काढला आहे.

RBI ने ही समस्या दूर करण्यासाठी 1 लाखांवरून 5 लाख रुपयांचे UPI पेमेंट केले जाऊ शकते असे सांगितले आहे. मात्र यासाठी सरकारने काही अटी लागू केल्या आहेत.

Online Payment l 1 लाख रुपयांवरुन 5 लाखांपर्यंत मर्यादा वाढवली 

NPCI ने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्थांच्या अत्यावश्यक कामांसाठी पेमेंट ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत करू शकता. महत्वाचं म्हणजे हा नवा नियम 10 जानेवारीपासून लागू होणार असल्याचे NPCI ने स्पष्ट केले आहे.

Online Payment l पेमेंट मर्यादेत केली वाढ 

NPCI च्या माहितीनुसार व्यापाऱ्यांसाठी 5 लाख रुपयांची पेमेंट मर्यादा लागू करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी व्यापाऱ्यांना पेमेंट मोड म्हणून UPI अॅक्टिव्ह करून घेणे गरजेचे आहे. तसेच NPCI द्वारे पेमेंटची मर्यादा दिवसासाठी तब्बल 1 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

मागच्या नियमांनुसार RBI ने 5 लाख रुपये पेमेंट मर्यादा दिली होती, मात्र यामध्ये आता बदल करण्यात आला आहे. यामुळे Paytm, Google Pay आणि PhonePe यांसारख्या ऑनलाईन पेमेंट अॅप्सना याचा नक्कीच फायदा होईल.

Online Payment l सर्वात जास्त भारतात सर्वात UPI व्यवहार 

भारतामध्ये गेल्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये 118 अब्ज रुपयांचे UPI पेमेंट केले आहेत. महत्वाचं म्हणजे मागच्या वर्षीच्या म्हणजेच 2022 च्या तुलनेत 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही

Credit Card l क्रेडिट कार्ड लिमिट वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा