‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Manjot Singh | 2023 मधील रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्या ‘अ‍ॅनिमल’ (animal) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातीलच एका अभिनेत्याचे सध्या सोशल मीडियावर प्रचंड कौतुक केलं जात आहे.

‘अ‍ॅनिमल’ फेम मनजोत सिंगने (Manjot Singh) आत्महत्या करणाऱ्या एका तरुणीचा जीव वाचवला आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होतोय. सदरील व्हिडीओ हा चार वर्षांपूर्वीचा असून तो आता व्हायरल होत आहे. त्यामुळे मनजोत सिंगचे सर्वत्रच कौतुक केले जात आहे.

Manjot Singh | व्हायरल व्हिडीओत नेमकं काय?

साधारण 2019 मधील व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये मनजोत सिंग एका मुलीला वाचवताना दिसून येत आहे. ही मुलगी कॉलेजच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. याच क्षणी मनजोत सिंगने मोठ्या धैर्याने तीचा हात पकडून वर खेचत तीचा जीव वाचवला. त्यावेळी मनजोत ग्रेटर नोएडा येथील शारदा विद्यापीठातून बीटेकचे शिक्षण घेत होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by RoYaL (@royal_manjjot_singhh)

मनजोतने व्हिडीओ शेअर करत म्हटलं कि, “2019 मध्ये हा प्रकार घडला होता. एक मुलगी आत्महत्या करत होती. मात्र देवाच्या कृपेने मी तिला वाचवू शकलो. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी होतो. आपल्या सर्वांना आयुष्यामध्ये कित्येक समस्यांना आणि संकटांना तोंड द्यावं लागतं, पण कधीकधी त्यांचा सामना करून जगणं हेदेखील धैर्याचं काम आहे.”

Manjot Singh वर कौतुकाचा वर्षाव

मनजोतच्या या व्हायरल व्हिडीओवर सोशल मिडीयातून प्रचंड कौतुक केलं जात आहे. त्याला ‘रिअल लाइफ हिरो’ म्हटलं जात आहे. ‘हे सगळं घडत असताना मी तिथेच होतो. मी माझ्या डोळ्यांनी सर्व घटना तेव्हा पाहिली. तू तिथे वेळेवर पोहोचल्यानेच त्या मुलीचा जीव वाचला,’ अशी कमेंट्स एका चाहत्याने केली आहे.

या धाडसी कृत्यानंतर मनजोतचा दिल्लीतील शीख समुदायाकडून सन्मान करण्यात आला होतं. दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे (DSGMC) माजी अध्यक्ष मनजीत सिंग जीके यांनी मनजोतच्या नागरी सेवा परीक्षेच्या तयारीसाठी सर्व खर्च भरून पाठिंबा देण्याचे वचन दिले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही

Credit Card l क्रेडिट कार्ड लिमिट वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा