Aishwarya Rai अभिषेक पेक्षा जास्त कमावते, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

मुंबई | अभिनेत्री आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण सध्या करोडोंमध्ये कमावत आहेत. पण याशिवाय आणखी एक अभिनेत्री आहे जिची कमाई करोडोंमध्ये आहे आणि ती भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्री आहे. ही दुसरी तिसरी कोणी नसून ती अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागड्या अभिनेत्रींपैकी ऐश्वर्या एक आहे. नुकतंच तिच्या संपत्तीचा आकडा समोर आला आहे.

Aishwarya Rai आहे सर्वात महागडी अभिनेत्री

भारतातील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या राय बच्चन पहिल्या क्रमांकावर आहे. डीएनएच्या रिपोर्टनुसार ऐश्वर्याची एकूण संपत्ती 776 कोटी रुपये आहे. तिच्या स्क्रीनच्या वेळेनुसार ऐश्वर्या राय चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते.

ऐश्वर्या घेते सर्वाधिक मानधन

ऐश्वर्याने तिच्या फिल्मी करिअरमध्ये 50 हून अधिक चित्रपट केले आहेत. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. याच कारणामुळे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ऐश्वर्या पहिल्या क्रमांकावर आहे. चित्रपटांव्यतिरिक्त ऐश्वर्या इतर कामातूनही करोडो रुपये कमावते. टाईम्स ऑफ इंडियानुसार, ऐश्वर्या राय ब्रँड एंडोर्समेंटसाठी 80-90 लाख रुपये घेते. ऐश्वर्या राय एका दिवसाच्या कमिटमेंटसाठी 6 ते 7 कोटी रुपये घेते.

ऐश्वर्या राय नंतर आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोणचं नाव महागड्या अभिनेत्रींच्या यादीत आलं आहे. TV18 नुसार, आलिया आणि दीपिकाची एकूण संपत्ती 485 कोटी रुपये आणि दीपिकाची एकूण संपत्ती 314 कोटी रुपये आहे.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, ऐश्वर्या राय बच्चन अलीकडेच साऊथ चित्रपट पोन्नियन सेल्वनमध्ये दिसली होती. ऐश्वर्या राय हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. ऐश्वर्या राय हिने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. अनेक पुरस्कार देखील ऐश्वर्या राय हिला मिळालेत.

ऐश्वर्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. तिच्या पर्सनल लाईफमध्ये सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. तिच्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच संपत्तीवरून दोघांमध्ये भांडण झाल्याची चर्चा आहे. मात्र ऐश्वर्याची संपत्ती अभिषेक पेक्षा जास्त असल्याचं समोर आलं आहे. ऐश्वर्या सध्या अभिषेकपेक्षा जास्त कमवत असल्याचं समोर आलंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Tecno Pop 8 Launch l अवघ्या 5999 रुपयांत खरेदी करा या कंपनीचा स्मार्टफोन! मिळणार जबरदस्त फीचर्स

Barc TRP Report Week 52 l BARC ने जाहीर केला TRP रिपोर्ट; या 5 सिरीयलने मिळवले अव्वल स्थान

Girish Mahajan | मंत्री गिरीश महाजनांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ!

Online Payment l ऑनलाइन पेमेंट संदर्भात मोठी बातमी!; 10 जानेवारीपासून होणार नवे नियम लागू