Sharad Mohol चं शेवटचं स्टेटस… मर्डरआधी कुणाला म्हणाला होता… “दूर तुझसे मैं रहके बता क्या करू?”

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Mohol | पुण्यामधील कुख्यात गुंड शरद मोहोळची गँगवॉरमधून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेने पुण्यात (Pune) खळबळ माजली आहे. पोलीस याप्रकरणी अधिकचा तपास करत आहेत. आता, शरद मोहोळ याने लग्नाच्या वाढदिवशी आपल्या पत्नीसाठी ठेवलेलं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस (Sharad Mohol Whats App Status) व्हायरल होत आहे. लग्नाच्या वाढदिवशीच त्याच्या घराजवळच गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली.

शरद मोहोळच्या घरासमोर लग्नाच्या वाढदिवसानिमित (Sharad Mohol Marraige Anniversary) बरीच गर्दी झाली होती. सर्वजण शरदला शुभेच्छा देत होते. त्याच्यानंतर त्याच्यासोबत असलेल्यांनीच त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

पत्नीला दिल्या अनोख्या शुभेच्छा-

‘दूर तुझसे मैं रहके बता क्या करू? क्या करु’, गाण्यावर शरद मोहोळ याने पत्नी स्वाती (Swati Mohol) हिला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्याने स्टेटसमध्ये दोघांचा फोटो पोस्ट केला होता. त्याचं हेच स्टेटस आता प्रचंड व्हायरल होत आहे. त्यानंतर काही तासातच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला.

सदरील प्रकरणी पुणे पोलिसांनी दोन वकिलांना देखील अटक केली आहे. वकिलांना अटक झाल्याने अनेकजण यामागील कारणांचा शोध घेत आहेत. मुख्य आरोपींना कट रचण्यात तसेच पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या अटक केलेल्या दोन्ही वकिलांवर करण्यात आला आहे.

साथीदारांनीच केला गोळीबार-

दरम्यान, शरद मोहोळ गोळीबार प्रकरणी मोठी माहिती समोर आली आहे. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज (Sharad Mohol CCTV Footage) समोर आले आहे. त्यानुसार शरदवर चार राऊंड फायर केल्याचे दिसते आहे. शरदच्या साथीदारांनीच त्याच्यावर गोळीबार केल्याचे दिसत आहे. गोळ्या झाडल्यानंतर लगेच त्यांनी तिथून पळ काढला.

पुण्याच्या कोथरुडमधील (Kothrud, Pune) मध्यवस्तीत भर दुपारी हा प्रकार घडल्याने पुण्यातील नागरिकांमध्ये सध्या याचीच चर्चा होत आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी (Pune Police) शिरवळजवळ ८ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३ पिस्तुल सुद्धा जप्त केले आहेत.

News Title- Sharad Mohol WhatsApp Status Viral

महत्त्वाच्या बातम्या- 

Black Coffee Benefits | डिप्रेशन आणि ताण होईल दूर; ‘ब्लॅक कॉफी’ चे हे फायदे माहितीयेत का?

Aishwarya Rai अभिषेक पेक्षा जास्त कमावते, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Tecno Pop 8 Launch l अवघ्या 5999 रुपयांत खरेदी करा या कंपनीचा स्मार्टफोन! मिळणार जबरदस्त फीचर्स

Barc TRP Report Week 52 l BARC ने जाहीर केला TRP रिपोर्ट; या 5 सिरीयलने मिळवले अव्वल स्थान