Rhea Chakraborty ला CBI चा दणका?; सुशांत सिंह प्रकरणी मोठी अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rhea Chakraborty | दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) नार्कोटेक्स कंट्रोल ब्युरोने अटक केली होती. सुशांतच्या कुटुंबीयांनी रियाविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी अजूनही तपास सुरुच असून आता रिया चक्रवर्तीच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. कारण सीबीआय (CBI) लवकरच लुक आउट नोटीस विरोधात सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

CBI ने रिया चक्रवर्ती विरोधात लुकआउट नोटीस (Lookout Notice) जारी केली होती. या नोटीसीविरोधात रियाने याचिका दाखल केली होती. यासंदर्भातच मुंबई हाय कोर्टाने रियाच्या 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत परदेशात जाणाऱ्या लुक आऊट नोटीसला स्थगिती दिली होती. त्यामुळे नवीन वर्षाच्या सुट्ट्या साजरा करण्यासाठी रिया (Rhea Chakraborty) विदेशात गेली होती. लवकरच ती भारतात परतणार आहे. मात्र या लुकआउट नोटीस विरोधातच आता सीबीआय सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याची माहिती मिळत आहे.

सदरील प्रकरणी फेब्रुवारी महिन्यात निर्णय येणार आहे. कोर्टाने रियाचे आई-वडील यांचे पासपोर्ट परत करण्याचे आदेश सीबीआयला दिले आहेत. हे प्रकरण 30 जानेवारी पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. पण सीबीआय सुप्रीम कोर्टात जाणार असेल तर रियाच्या अडचणीत यामुळे वाढ होऊ शकते.

Rhea Chakraborty | CBI सुप्रीम कोर्टात जाणार?

दरम्यान, बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत 14 जून 2020 रोजी त्याच्या बांद्रा येथील निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आला होता. सुशांतच्या वडिलांनी रिया विरोधात एफआयआर दाखल केला होता. याच आधारावर सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे.मात्र, लुक आउट नोटीसविरोधात रियाने (Rhea Chakraborty)मुंबई हायकोर्ट ऐवजी पाटणा येथे याचिका दाखल करून आपली विनंती करायला हवी होती. अधिकारक्षेत्र नसतानाही मुंबई हाय कोर्टाने रियाला दुबईला जाण्याची परवानगी दिली. याच विरोधात आता CBI सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे म्हटले जात आहे.

News Title : Big update about Rhea Chakraborty

महत्त्वाच्या बातम्या-

Christian Oliver | धक्कादायक बातमी! बड्या अभिनेत्याचा दोन चिमुकल्या मुलींसह विमान अपघातात मृत्यू

Sukanya Samriddhi Yojana l लेकीच्या भविष्याची चिंता विसरा; केंद्र सरकारची ही योजना ठरेल फायद्याची

Stadium मध्ये अंडरवेअरचा खजिना अन् घाणीचे साम्राज्य; BCCI कारवाई करणार?

TATA च्या चौथ्या इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; Punch.ev चे 4 रंग, जाणून घ्या सर्वकाही

Credit Card l क्रेडिट कार्ड लिमिट वाढवायचयं? तर या टिप्स फॉलो करा