Pune News | शरद मोहोळचा खात्मा करुन मुन्ना पळाला, मात्र पुढे… पुणे पोलिसांनी सांगितला घटनेचा थरार

Pune News | पुण्यातील कोथरुड (Kothrud) परिसरात भर दुपारी कुख्यात गुंड शरद मोहळची (Sharad Mohol) हत्या करण्यात आली. कोथरुड येथील सुतारदरा परिसरात हा प्रकार घडल्याने अजूबाजूच्या परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. शरद मोहोळ घराबाहेर पडत असताना मागून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. मात्र, त्याच्यावर हल्ला कोणी केला?, याचा तपास सुरु असताना पोलिसांनी सापळा रचत अवघ्या 8 तासातच मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

कशा प्रकारे रचला सापळा?

पुण्याच्या (Pune News) गजबजलेल्या परिसरात भरदिवसा शरद मोहोळवर हल्ला झाल्याने संपूर्ण पुणे शहर हादरलं आहे. शरदवर हल्ला झाल्यानंतर पोलिस घटनास्थळी आले. तेव्हा स्थनिक नागरिकांनी मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहील पोळेकरचं (Munna Polekar) नाव सांगितलं. शरद मोहोळ याच्यावर मुन्नाने हल्ला केल्याचं समोर आल्याने पोलिसांनी सापळा रचला.

शरद मोहोळवर हल्ला केल्यानंतर मुन्ना दुचाकीवरुन पळून गेला. आणि हीच गोष्ट लक्षात घेत पोलिसांनी मुन्नाबदल चौकशी सुरु केली. मुन्ना पोळेकर याच्या मूळ गावी चौकशी केली. मात्र तो तिथे मिळाला नाही. गोळीबार करून तो दुचाकी घेऊन पळून गेला होता, त्या गाडीचा शोध घेतल्यावर ती बेवारस स्थितीत आढळली.

पुढे काय घडलं?

पोलिसांनी (Pune News) मुन्नाबदल अधिक माहिती घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, मुन्नाकडे चारचाकी गाडी असल्याचं समजलं. त्यानंतर या गाडीचा नंबर ट्रेस केला गेला. शिवाय शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व टोलनाक्यांवर शोध घेतला. यामधील शिवापूर टोल नाक्यावरून ही गाडी गेल्याचं निष्पन्न झालं. शिरवळजवळ दोन गाड्यांमध्ये पोलिसांना आठ आरोपी सापडले.

मामाने भाच्याच्या मदतीने केला गेम-

मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडेंचा (Namdev Kangude) आणि शरद मोहोळ यांचे जुनावाद होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुन्नाने तीन महिन्यापूर्वीच पिस्टल घेतली होती. नामदेव कानगुडे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत.

मुख्य आरोपी पोळेकर आणि शरद मोहोळ यांचं घर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे. मोहोळ जवळ जाणाऱ्या पोरांच्या संपर्कात मुन्ना आला आणि त्यांच्या मदतीने रेग्युलर मोहोळकडे जायला लागला होता. आरोपी मुन्ना याला मोहरा बनवत त्याचा मामा नामदेव कानगुडे याने मोहोळला संपवलं.

News Title : pune-news main accused in police custody

महत्त्वाच्या बातम्या-

Pune News : शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी 2 वकिलांना अटक, आणखी मोठ्या व्यक्तीचा सहभाग?

Black Coffee Benefits | डिप्रेशन आणि ताण होईल दूर; ‘ब्लॅक कॉफी’ चे हे फायदे माहितीयेत का?

Aishwarya Rai अभिषेक पेक्षा जास्त कमावते, संपत्तीचा आकडा वाचून थक्क व्हाल

‘Animal’ फेम Manjot Singh ने वाचवला मुलीचा जीव; व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल

Tecno Pop 8 Launch l अवघ्या 5999 रुपयांत खरेदी करा या कंपनीचा स्मार्टफोन! मिळणार जबरदस्त फीचर्स