Ram Mandir | रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव अन् प्रत्येकाची इच्छा पूर्ण करणारे आश्रम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | 22 जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राम मंदिर ट्रस्टकडून विविध क्षेत्रातील दिग्गजांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराची पायाभरणी होणार आहे. अशातच उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक आश्रम चर्चेत आला आहे. आग्रा येथील सिंगाना गावात शृंगी ऋषींचा आश्रम असून तिथे देखील भगवान श्री रामलला प्राणप्रतिष्ठेच्या उत्सवाची तयारी सुरू आहे.

शृंगी ऋषी राजा दशरथाच्या आमंत्रणावरून अयोध्येला गेले आणि त्यांनी पुत्र कामष्टीसाठी यज्ञ केला, असे सांगितले जाते. विशेष बाब म्हणजे या गावातील लोक प्रभू रामाला मामा असे संबोधतात. प्रभू रामांना मामा म्हणण्याचे कारण म्हणजे राजा दशरथ यांची कन्या म्हणजेच देवाची बहीण संत कुमारी हिचा विवाह ऋषी श्रृंगीशी झाला होता.

Ram Mandir अन् देशभर उत्साहाचे वातावरण

सिंगाना या गावात यमुनेच्या तीरावर शृंगी ऋषींचा आश्रम बांधण्यात आला आहे. जिथे लोक त्यांच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी प्रार्थना करतात. पुत्रप्राप्तीची इच्छा घेऊन जो कोणी शृंगी ऋषींच्या आश्रमात येतो, त्याची मनोकामना पूर्ण होते, अशी धारणा आहे. स्थानिक लोकांची आश्रमावर मोठी श्रद्धा आहे.

राजा दशरथाच्या हाकेवर शृंगी ऋषींनी अयोध्येला जाऊन पुत्र कामष्टीसाठी यज्ञ केला आणि त्यानंतर रामलक्षण भरत शत्रुंगाचा जन्म झाला, असेही बोलले जाते. भगवान प्रभू श्रीरामाला मामा म्हणणारे लोक 22 जानेवारीला भजन, किर्तन करून उत्सव साजरा करणार आहेत. तसेच हवन, भंडारा आणि दिव्यांची रोषणाई करून भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात सहभाग नोंदवणार आहेत.

रामललाला ‘मामा’ म्हणणारं गाव

शृंगी ऋषी आश्रमाचे महंत निरंजन दास यांनी सांगितले की, हा आश्रम शृंगी ऋषींचे तपश्चर्या करण्याचे स्थान आहे. हे तेच ठिकाण आहे जिथे शृंगी ऋषींनी तपश्चर्या केली होती. शृंगी ऋषींनी अयोध्येला जाऊन आपल्या मुलासाठी कामष्टी यज्ञ केला होता, त्यानंतर राजा दशरथ यांना पुत्रप्राप्ती झाली.

शृंगी ऋषींच्या या खास भूमीवर लोकांची विशेष श्रद्धा आहे, जे लोक पुत्रप्राप्तीची इच्छा घेऊन येतात त्यांची मनोकामना पूर्ण होते. तसेच राजा दशरथाची कन्या संताकुमारी हिचा विवाह श्रृंगी ऋषीशी झाला होता, त्यामुळेच येथील लोक श्री रामाला मामा असे म्हणतात. शृंगी ऋषींचा अयोध्येशी थेट संबंध असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे.

Alia Bhatt चा ‘जलवा’! Animal ची सक्सेस पार्टी; रणबीरही दिसला डॅशिंग

Kisan Vikas Patra Yojna l फायद्याची बातमी! पोस्ट ऑफिसच्या या योजनेत पैसे गुंतवल्यास होणार दुप्पट

Ram Mandir | वडिलांची इच्छा अन् 8000 किमी चालत वृद्धाची अयोध्येकडे कूच

PAK vs AUS | पाकिस्तानचा दारूण पराभव पण भारताचे मोठे नुकसान, ऑस्ट्रेलिया सुसाट

Ambati Rayudu ची पलटी! 10 दिवसांपूर्वी राजकारणात प्रवेश; आता घेतला वेगळाच निर्णय