Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Babies Teething l लहान मुलांना दात येताना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. दात येण्याच्या काळात हिरड्या दुखणे, ताप येणे किंवा शरीरात जडपणा येणे, चिडचिड होणे, रडणे तर काही वेळा उलट्या होणे, जुलाब होणे, लूज मोशन होणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशावेळी पालकांनी घाबरून न जात काही घरगुती उपाय करणे आवश्यक आहे.

हिरड्यांची मालिश करणे :

लहान मुलांना 4 महिन्यांपासून पुढे दात येण्यास सुरवात होते. अशावेळी बाळाच्या हिरड्या सुजतात आणि वेदना होतात.

जर तुमच्या मुलाच्या हिरड्या सुजल्या असतील किंवा तो रडत असेल तर त्याच्या हिरड्यांना हलक्या हाताने मसाज करा. यामुळे वेदना आणि सूज कमी होण्यास मदत होईल आणि मुलाला आराम मिळेल.

Babies Teething l गाजर चघळायला द्यावे :

दात येताना बाळांना सतत काही चावत राहावे वाटते. अशावेळी तुम्ही बाळाला गाजर चावायला देऊ शकतात. गाजरामध्ये अ जीवनसत्त्व असते. डोळ्याच्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असते. त्यामुळे बाळाला गाजर चावायला देऊ शकता.

थंड दुधाची बाटली :

बाळाला दात येताना त्रास होत असेल तर तुम्ही दुधाची थंड बाटली दूध पिण्यासाठी देऊ शकता. बाळ दूध पिताना त्याच्या हिरड्यांवर थोडासा जोर पडल्याने हिरड्यांच्या वेदना (Babies Teething) कमी होतात. याशिवाय तुम्ही बाळाच्या हिरड्यांवर व्हॅनिला एक्सट्रेक लावल्याने देखील आराम मिळू शकतो.

टिथींग बिस्किट :

बाळाला दात येत असल्यास टिथींग बिस्किट खायला द्यावे. ही बिस्किटे गोड नसतात मात्र दात येणाऱ्या बाळांना वेदना (Babies Teething) आणि त्रासापासून सुटका होण्यास मदत मिळू शकते. तसेच दात येताना बाळाला त्रास होत असल्याने बाळांच्या हिरड्या वारंवार साफ करत राहा.

टीप : जर तुमच्याही बाळाला दात येताना त्रास होत असेल तर तुम्ही घरगुती उपाय करण्यासोबतच बालरोग तज्ञ् डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणतीही मोठी समस्या उध्दभवणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral

Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार