Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Voter ID Card l राज्यात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच महाराष्ट्रात मार्च- एप्रिल महिन्यात लोकसभेची निवडणूक होण्याची चिन्हे दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांसह कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे. मात्र या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी देखील मतदान कार्ड काढणे आवश्यक आहे. परंतु आता मतदान कार्ड काढण्यासाठी सरकारी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. कारण आता तुम्ही घरबसल्या मतदान कार्ड काढू शकता.

घरबसल्या मतदान काढण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज! :

Step 1 : सर्वप्रथम तुम्हाला भारतीय निवडणूक आयोगाच्या voterportal.eci.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा.
Step 2 : यानंतर राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलवर क्लिक करा.
Step 3 : यानंतर पुढे ‘नवीन मतदार नोंदणीसाठी ऑनलाइन अर्ज करा’ यावर क्लिक करा.

Step 4 : यानंतर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल.
Step 5 : पुढे तुम्हाला विचारलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
Step 6 : आता तुम्हाला “सबमिट” वर क्लिक करावे लागेल.

Voter ID Card l मतदान काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

1) पासपोर्ट आकाराचा फोटो
2) ओळखीचा पुरावा (पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, जन्म प्रमाणपत्र)
3) रहिवासी पुरावा (रेशन कार्ड, पासपोर्ट, डीएल किंवा वीज बिल)

मतदार ओळखपत्रासाठी कोण अर्ज करू शकतो?

– अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
– अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे कायमस्वरूपी निवासी पत्ता असणे आवश्यक आहे.
– अर्जदाराचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.

एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासा (Voter ID Card) :

एसएमएसद्वारे मतदार यादीतील नाव तपासण्यासाठी सर्वात प्रथम मेसेज टाईप करताना स्पेस दाबा. त्यानंतर नंतर तुमचा मतदार ओळखपत्र क्रमांक टाईप करा. हा एसएमएस 9211728082 किंवा 1950 वर पाठवा. याचे उत्तर तुम्हाला एसएमएसमध्ये मिळेल. तसेच एसएमएसमध्ये भाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक आणि नाव पाठवले जाईल. तुमचे नाव मतदार यादीत नसल्यास, ‘नो रेकॉर्ड सापडले नाही’ असे लिहिले जाईल. अशाप्रकारे तुम्ही निवडणुकीपूर्वी मतदान कार्ड काढू शकता.

महत्त्वाच्या बातम्या-

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral

Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार