Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Invest Money l प्रत्येकाला जीवनात आपले उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कुठे नं कुठे तरी गुंतवणूक करणे हे आवश्यक असते. सध्याच्या घडीला भारतात वाढणारी महागाई टाळण्यासाठी बचत करणे फार महत्वाचे आहे. समजा जर एका महिन्यात तुमचा खर्च 10 हजार रुपये असेल तर येत्या 18 ते 20 वर्षांत 5 टक्के महागाई दराने तोच खर्च 40 हजार रुपयांपर्यंत होईल. त्यामुळे अशा परिस्थितीत आपण केवळ बचत करूनच नाही तर बचत सोबत कमाई करणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

शेयर बाजारातील इक्विटीमध्ये गुंतवणूक करा :

जेव्हा तुम्ही कोणत्याही ठिकाणी गुंतवणूक करता तेव्हा तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमची गुंतवणूक अशी असावी की, ती महागाईवर मात करू शकेल. त्यामुळे तुम्ही शेयर बाजारातील इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे ही तुमची निवड होऊ शकते.

इतकेच नव्हे तर इक्विटीमध्ये गुंतवणूक (Equity Investment) केल्याने कुठे तरी तुम्हाला महागाईचा सामना करण्यास देखील मदत होते आणि त्याचा जास्त परतावा गुंतवणूकदाराला मिळतो. तसेच तर तुम्हाला हवे असल्यास तुम्ही म्युच्युअल फंड अथवा शेयर बाजारातील स्टॉक्सच्या (Share Market) माध्यमातून इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकता. जे तुम्हाला अधिक परतावा मिळवण्याची संधी देते.

Invest Money l गुंतवणुकीवर चांगला परतावा ठेवण्यासाठी हे करा! :

आपल्यापैकी बरेच लोक आजही बचत खात्यात पैसे ठेवतात. परंतु तुम्ही असे केल्यास तुम्हाला फक्त व्याज मिळत असते परंतु बचत खात्यात पैसे ठेवणे ही सर्वात मोठी चूक असल्याचे अनेक नामांकित आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.

त्यामुळे आर्थिक सल्लागारांच्या म्हण्यानुसार हे पैसे तुम्ही बचत खाते सोडून इतरत्र गुंतवावेत असे केल्यास मार्केट रेटनुसार तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची संधी मोठी असते. सोबतच याव्यतिरिक्त तुम्ही चांगल्या बँकांमध्ये एफडी करू शकता किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूककरून एखादी चांगली रक्कम गोळा करू शकते.

भविष्यातील तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी (उदा. घर, गाडी, शैक्षणिक खर्च, इत्यादीसाठी) तुमची गुंतवणूक खूप महत्त्वाची आहे. एवढेच नव्हे तर तुमचा पगारही 30 ते 40 हजार असेल तरी देखील तुम्ही तुमचा खर्च काढून काही पैसे वाचवावे व त्याची योग्य ठिकाणी बचत करावी.

महत्त्वाच्या बातम्या-

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला