TRP Report : टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ मालिकेने पटकवला पहिला क्रमांक!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

TRP Report : प्रेक्षकांना छोट्या पडद्यावरील मराठी मालिका पाहायला जास्त आवडतात. मराठी मालिकेतील फॅमिली ड्रामा प्रत्येकाला आपल्या घरातील जिव्हाळ्याचा विषय वाटतो. अशातच मालिका विश्वातील TRP रिपोर्ट नुकताच जाहीर झाला आहे. यामध्ये अभिनेत्री जुई गडकरीच्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेने 2023 मध्ये वर्चस्व गाजवलं आहे. अशातच आता ‘ठरलं तर मग’ ही मालिका 2024 हे वर्ष देखील गाजवण्यास सज्ज झाली आहे. तर आज आपण TRP रिपोर्ट मध्ये कोणकोणत्या मालिकेने वर्चस्व गाजवलं आहे हे जाणून घेऊयात.

ठरलं तर मग :

ठरलं तर मग या मालिकेने TRP मध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे. जुई गडकरींच्या या मालिकेला 6.9 रेटिंग मिळाले आहे. त्यामुळे मराठी मालिका विश्वात जुईच्या मालिकेचा दबदबा असल्याचे दिसून आले आहे.

लक्ष्मीच्या पाऊलांनी :

‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ या मालिकेने TRP रिपोर्टमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. अगदी कमी कालावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची चांगली लोकप्रियता दर्शवली आहे. त्यामुळे TRP रिपोर्टमध्ये या मालिकेला 6.8 रेटिंग मिळाले आहेत.

TRP Report l ‘प्रेमाची गोष्ट’ :

स्टार प्रवाह या वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेने सर्वच प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. या मालिकेने अल्पावधीत लोकप्रियतेचा शिखर गाठला आहे. या मालिकेला 6.8 इतके TRP रेटिंग मिळाले आहे.

तुझेच मी गीत गात आहे :

आठवड्याच्या टेलीव्हिजन टीआरपी (TRP Report) यादीमध्ये तुझेच मी गीत गात आहे या मालिकेने 6.4 रेटिंग मिळवले आहे. प्रेक्षक या मालिकेला उदंड असा प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे या मालिकेने TRP मध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे.

TRP Report l ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ :

कौटुंबिक जीवनावर आधारित असलेली ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका एका वेगळ्याच वळणावर येऊन ठेपली आहे. या मालिकेने TRP रिपोर्टमध्ये पाचव्या क्रमांक पटकावला असून या मालिकेला 6.0 रेटिंग मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला