Saindhav | बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui) लवकरच तेलुगु सिनेमात दिसून येणार आहे. त्याचा आगामी चित्रपट ‘सैंधव’ (Saindhav) द्वारे तो तेलुगु सिनेमात डेब्यू करणार आहे. या चित्रपटाच्या शुटींगवेळीच त्याच्या सोबत एक धक्कादायक घटना घडली, ज्यातून तो थोडक्यात वाचला. या घटनेचा खुलासा त्याने स्वतः मिडियाशी बोलताना केला आहे.
‘हड्डी’,’गँग्स ऑफ वासेपूर’,’बजरंगी भाईजान’आणि ‘किक’या चित्रपटांत आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करून नवाजुद्दीनने (Nawazuddin Siddiqui ) बॉलीवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता तो ‘सैंधव’ (Saindhav) द्वारा तेलुगु इंडस्ट्रीमध्ये आपलं नाव कमावण्यास सज्ज झाला आहे.
‘Saindhav’ च्या सेटवर नेमकं काय घडलं?
मिडियाशी संवाद साधताना नवाजुद्दीन सिद्दीकीने (Nawazuddin Siddiqui ) आपल्यासोबत घडलेल्या घटनेचा खुलासा केला. “आम्ही श्रीलंकेत शूटिंग करत होतो. समुद्रात बोटीत असताना एक मोठी लाट आमच्या वाटेवर आली आणि मी बोटीत पडलो. सुदैवाने, मी समुद्रात न जाता बोटीच्या आत पडलो. नाहीत होत्याचे नसते झाले असते.”, असं नवाजुद्दीन म्हणाला.
View this post on Instagram
विशेष म्हणजे, हा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला असून दिग्दर्शकाने हा सीन चित्रपटात शॉटच्या रुपात ठेवला आहे. प्रेक्षकांना तो प्रचंड आवडेल,अशी खात्री नवाजुद्दीनने व्यक्त केली आहे.
Saindhav चित्रपटात ‘या’ भूमिकेत दिसणार नवाजुद्दीन |
नवाजुद्दीन सिद्दीकी (Nawazuddin Siddiqui ) आणि व्यंकटेश यांच्या ‘सैंधव’ (Saindhav) या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला आहे. यामध्ये नवाजुद्दीन खलनायकाची भूमिका साकारणार आहे. ट्रेलरमध्येच आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ट्रेलर पाहूनच नवाजुद्दीन आणि व्यंकटेशची जोडी चाहत्यांना प्रचंड भावत आहे.
यावेळी व्यंकटेशसोबत काम करतानाचा अनुभवही नवाजुद्दीनने शेअर केला. ‘व्यंकटेशकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, त्याच्यासोबत शूटिंग करणं हा एक चांगला अनुभव होता. व्यंकटेशने अॅक्शन सीनमध्ये खूप मेहनत घेतली आहे.कोणाचीही मदत न घेता त्याने हे सर्व केले.चित्रपटात त्याची एक नवीन बाजू तुम्हाला पाहायला मिळणार आहे.’,असं नवाजुद्दीन म्हणाला. दरम्यान, ‘सैंधव’ हा चित्रपट 13 जानेवारी 2024 रोजी सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज
Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला
MS Dhoni ला हुक्क्याची ‘हुक्की’, चाहते बुचकळ्यात! Video Viral
Ather 450 Apex l Ather ची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! प्रति तास 100 किमी धावणार