Kangana Ranaut चा पुन्हा एकदा जावेद अख्तरांशी पंगा?; ‘त्या’ प्रकरणी हायकोर्टात धाव

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Kangana Ranaut | अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत असते. तीच्या वक्तव्यांमुळे ती खुपदा अडचणीत सापडली आहे. आता पुन्हा एकदा कंगना चर्चेत आली आहे. गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar ) यांच्या विरोधात ती आता थेट हायकोर्टात धाव घेणार आहे. जावेद अख्तर यांनी तीच्याविरोधात केलेल्या मानहानीच्या दाव्याविरोधात ती बॉम्बे हाय कोर्ट (Bombay High Court)मध्ये याचिका दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे.

2020 सालच्या या प्रकरणावर ९ जानेवारीला सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी केली जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

अभिनेता हृतिक रोशन आणि कंगना रनौत (Kangana Ranaut ) यांच्यात 2016 साली ईमेल एक्सचेंज संबंधित जोरदार भांडण झालं होतं. हे प्रकरण तेव्हा प्रचंड चिघळले होते. यावेळी रोशन कुटुंबाच्या जवळचे मानले जाणारे जावेद अख्तर यांनी कंगना रणौतला हृतिक रोशनची माफी मागावी, असे आवाहन केले होते. तर, 2021 मध्ये एका टेलिव्हिजन मुलाखतीदरम्यान कंगनाने 2016 च्या एका भेटीचा उल्लेख केला होता. यावरूनच जावेद अख्तर यांनी तिच्याविरुद्ध मानहानीची तक्रार दाखल केली होती.

यासोबतच कंगनानेही अख्तर यांच्याविरुद्ध क्रॉस तक्रार दाखल करत गुन्हेगारी कट, खंडणी आणि विनयभंगाचा आरोप केला होता. याला जावेद अख्तर यांनीही प्रतीउत्तर दिले होते. या प्रकरणीच मोठी माहिती समोर आली आहे.

Kangana Ranaut ला जावेद अख्तर यांचे प्रतिउत्तर|

कंगनाने (Kangana Ranaut ) केलेल्या आरोपांवर नंतर 24 जुलै 2023 रोजी अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अख्तर यांच्यावरील खंडणीचे आरोप वगळले होते. मात्र, भारतीय दंड संहिता (IPC) च्या कलम 506 आणि 509 अंतर्गत गुन्ह्याच्या संदर्भात त्यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. याविरोधात अख्तर यांनी दिंडोशी येथील सत्र न्यायालयात समन्स बजावण्याच्या आदेशाला आव्हान देणारा रिव्हिजन दाखल केला होता. या फेरविचार अर्जावर अंतिम सुनावणी होईपर्यंत सत्र न्यायाधीशांनी आदेश व फौजदारी कारवाईला स्थगिती दिली होती.

सदरील प्रकरणी 9 जानेवारीला पुढील सुनावणी होण्याची शक्यता आहे. या प्रकरणीच कंगना पुन्हा एकदा बॉम्बे हाय कोर्टमध्ये जाणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कंगना रनौत आणि जावेद अख्तर पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Ayodhya Ram Mandir | प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता भावूक; म्हणाला, “खूप काही गमावून…”

‘Saindhav’च्या शूट दरम्यान थोडक्यात वाचला नवाजुद्दीन सिद्दीकी; म्हणाला, “मी लकी होतो…”

Bigg Boss 17 | ‘फालतू कुठला…”, अंकिताचा नवऱ्यासोबत बिग बॉसच्या घरात मोठा राडा

TRP Report : टीआरपीच्या शर्यतीत ‘या’ मालिकेने पटकवला पहिला क्रमांक!

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

News Title- Kangana Ranaut Javed Akhtar Controversy