Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aditya Thackeray । आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे तिकिट मिळवण्यासाठी आणि आयपीएल लिलावात फ्रँचायझींना आकर्षित करण्यासाठी खेळाडूंची रणजी ट्रॉफी स्पर्धेतील कामगिरी महत्त्वाची मानली जाते. यंदाच्या रणजी ट्रॉफीच्या हंगामाला 5 जानेवारीपासून सुरूवात झाली आहे. सध्या विदर्भ आणि सर्व्हिसेस यांच्यात नागपूरच्या व्हिसीए स्टेडियमवर सामना पार पडत आहे. खरं तर 2024 च्या रणजी हंगामात काही नव्या चेहऱ्यांना मोठ्या व्यासपीठापर्यंत पोहचण्याची संधी मिळाली आहे. हा रणजी ट्रॉफी स्पर्धेचा 89 वा हंगाम आहे.

दोन वेळचा विजेता विदर्भचा संघ पुन्हा एकदा ट्रॉफीवर कब्जा करण्यासाठी सज्ज आहे. विदर्भाच्या संघातून अकोल्याच्या दोन खेळाडूंची रणजी कारकीर्द सुरू झाली आहे. कारण आदित्य ठाकरे आणि दर्शन नळकांडे यांना विदर्भाच्या संघात स्थान मिळाले आहे. यष्टीरक्षक अक्षय वाडकरकडे विदर्भच्या संघाची धुरा आहे. 2017-2018 असे सलग दोन वर्ष विजेतेपद पटकावण्यात विदर्भच्या संघाला यश आले.

Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात

मात्र, आता विदर्भचा संघ नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात मैदानात आहे. कारण किताब जिंकला तेव्हा विदर्भच्या संघाची कमान फैज फजलकडे होती. पण, यंदा नवनिर्वाचित कर्णधार अक्षय वाडकर काही कमाल करतो हे पाहण्याजोगे असेल. विदर्भाने रणजी ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी 17 सदस्यीय संघ जाहीर केला. कधीकाळी भारताच्या आंतरराष्ट्रीय संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून खेळलेल्या उमेश यादवला देखील संधी मिळाली आहे.

दरम्यान, सध्या विदर्भ आणि सर्व्हिसेस यांच्यात सलामीचा सामना सुरू आहे. एलिट ग्रुप 1 मधील या सामन्याचा थरार विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर रंगला आहे. दुसऱ्या सामन्यात मणिपूरशी भिडण्यासाठी विदर्भचा संघ गुजरातला रवाना होईल. हा सामना 12 जानेवारीपासून खेळवला जाईल. विदर्भ साखळी फेरीतील अखेरचा सामना 16 फेब्रुवारीला हरयाणाविरूद्ध खेळेल.

विदर्भचे 11 शिलेदार –

अक्षय वाडकर (कर्णधार), फैज फजल, ध्रुव शोरी, करूण नायर, शुभम दुबे, आदित्य सरवटे, संजय रघुनाथ, दर्शन नळकांडे, उमेश यादव, अक्षय वाखरे आणि आदित्य ठाकरे.

सर्व्हिसेसचे 11 शिलेदार –

रजत पालीवाल (कर्णधार), शुभम रोहिला, रवी चौहान, नितीन यादव, अर्जुन शर्मा, वरूण चौधरी, विनीत धनखर, एल एस कुमार, अंशुल गुप्ता, पूनम पुनिया आणि पुलकित नारंग.

Kangana Ranaut चा पुन्हा एकदा जावेद अख्तरांशी पंगा?; ‘त्या’ प्रकरणी हायकोर्टात धाव

Aishwarya Rai-जया बच्चन यांच्यानंतर आलिया भट आणि सासू नितू कपूरचं बिनसलं?,व्हिडीओच आला समोर

Aishwarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्यात घटस्फोट होणार नाही?, मोठी माहिती आली समोर

Aishwarya Rai ची साथ विवेक ओबेरॉयने का सोडली?, विवेकच्या वडिलांनीच केला धक्कादायक खुलासा

Ayodhya Ram Mandir | प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारा अभिनेता भावूक; म्हणाला, “खूप काही गमावून…”