Aishwarya Rai-जया बच्चन यांच्यानंतर आलिया भट आणि सासू नितू कपूरचं बिनसलं?,व्हिडीओच आला समोर

Aishwarya Rai | 2023 मधील रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या ‘अ‍ॅनिमल’ (animal) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला कमावला. बॉक्स ऑफिसवर मिळालेळे यश साजरे करण्यासाठी चित्रपटाच्या निर्मात्यांनी एका सक्सेस पार्टीचं आयोजन केले होते. यावेळी चित्रपटाची सर्व कास्ट सोबतच रणबीर कपूर पत्नी आलिया भट्ट आणि आई नीतू सिंह सोबत उपस्थित होते.

‘अ‍ॅनिमल’च्या (Animal) या सक्सेस पार्टीमधीलच एक व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. या व्हिडिओमुळे चाहत्यांकडून वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. इंडस्ट्रीमध्ये सध्या अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai ) आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगत आहेत. आता आलिया भट आणि नीतू सिंह यांच्या व्हायरल व्हिडिओमुळे कपूर कुटुंबातही बिनसल्याचे म्हटले जात आहे.

आलियाने केलं सासू नीतू सिंहला इग्नोर?

पार्टीत जाताना रणबीर कपूर त्याची आई नीतू कपूरचा हात धरून चालत होता. त्याच्या मागे आलिया भट्ट आणि महेश भट्टही होते. नंतर सर्वजण मिडियासमोर उभे राहून फोटो क्लिक करताना दिसले. याच क्षणी आलिया आणि नीतू कपूर एकमेकांकडे दुर्लक्ष करताना दिसल्या. त्यांनी एकही सोबत फोटो काढला नाही.
आलियाची नजर फक्त पती रणबीर कपूरवरच खिळून होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या व्हायरल व्हिडिओनंतर सोशल मिडियावर चाहत्यांकडून अनेक अंदाज बांधले जात आहेत. एका यूजरने कमेंट करत म्हटलं कि,’सासू आणि सून एकमेकांकडे दुर्लक्ष करत आहेत.’तर एकाने लिहिले, ‘आलिया आणि नीतूची बॉडी लँग्वेज जरा वेगळीच दिसतीये. दोघींत भांडण झाल्याचं दिसतंय.’, अशा प्रतिक्रिया सोशल मिडियावर उमटत आहेत. काही दिवसांपूर्वीच जया बच्चन यांनी ऐश्वर्या बच्चनवर (Aishwarya Rai ) काही आरोप केले होते. त्यामुळे बच्चन सासू-सुनेच्या भांडणाच्या चर्चा असतानाच आता कपूर सासू-सुनेतही बिनसल्याचे म्हटले जात आहे.

रणबीरच्या ‘अ‍ॅनिमल’ची 500 कोटींची कमाई-

‘अ‍ॅनिमल’ या चित्रपटात रणबीरने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.या चित्रपटात त्याचा वेगळाच अंदाज दिसून आला. चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने चांगलीच कमाई केली आहे. 550 कोटींपेक्षा अधिक कमाई या चित्रपटाने केली आहे.

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीत रणबीर आणि आलिया एकदम स्टायलिश अंदाजात दिसून आले. आलियाने निळ्या रंगाचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केला होता तर रणबीर संपूर्ण काळ्या सूटमध्ये दिसला.

महत्त्वाच्या बातम्या-

Invest Money l बचत खात्यात पैसे ठेवणे योग्य की अयोग्य? गुंतवणुकीचा योग्य मार्ग काय?

Voter ID Card l अगदी काही मिनिटांत घरबसल्या मतदान कार्ड काढता येणार; असा करा अर्ज

Babies Teething l दात येताना बाळाला त्रास होतोय? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Captain Miller Trailer l साऊथ सुपरस्टार धनुषचा ‘कॅप्टन मिलर’ चित्रपट धुमाकूळ घालण्यास सज्ज

Sharad Mohol | अटक केलेला वकील कोर्टातच ढसाढसा रडू लागला, सांगितलं आरोपींना काय दिला सल्ला

News Title- Aishwarya Rai and Jaya Bachchan Controversy