Whatsapp Cyber Crime Alert l अलर्ट : तुम्हाला देखील WhatsApp वर ‘असा’ मेसेज आला आहे? वेळेवर व्हा सावधान अन्यथा…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Whatsapp Cyber Crime Alert l स्मार्टफोन व त्यामध्ये असलेले सोशल मीडिया अँप्स हे जितकं फास्ट आणि सर्वांसाठी सोयीस्कर आहे, तितकेच ते अलीकडच्या काळात धोकादायकही होऊ लागले आहे. होय..!! भारतात एकीकडे दिवसेंदिवस तंत्रज्ञान क्षेत्रात प्रगती होत असतांना दुसरीकडे गुन्हेगारी व सायबर हल्यात मोठी वाढ झाली आहे. असाच एक सायबर गुन्हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. मागील एक-दोन दिवसांपासून अनेक भारतीयांचा व्हाट्सअँपवर एक मेसेज येत असून याबाबत सायबर गुन्हे शाखेने सर्वांना अलर्ट राहण्याचा सल्ला दिला आहे..

नेमके प्रकरण काय?

Whatsapp Cyber Crime Alert l सध्या अनेक भारतीयांच्या व्हाट्सअँपवर ‘Hi, How Are You?’ असा मेसेज येत असून तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर, सावधान! कारण आताच्या घडीला तुमची एक चूक सायबर गुन्हेगारीला बळी पडू शकते. जगभरात सध्याचे व्हाट्सअँप वापरकर्ते पाहता WhatsApp हे हॅकर्सच्या निशाण्यावर आहे. त्यामुळे कदाचित या मेसेज मागे हॅकर्सचा हा नवा फंडा असल्याचे सायबर गुन्हे शाखेकडून सांगण्यात येत आहे.

सायबर तज्ज्ञांनी दिलेल्या अलर्टनुसार.. ‘Hi, How Are You? हा मेसेज सायबर गुन्हेगारांची नवी पद्धत असून अश्या मेसेजकडे दुर्लक्ष करा. तसेच मेसेजमध्ये आलेल्यां कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका किंवा कोणतेही अँप डाऊनलोड करून नका.

तुम्ही असे केल्यास तुमची माहिती अवघ्या काही मिनिटात हॅक केली जाऊ शकते आणि हॅकर (Whatsapp Cyber Crime Alert) याचा वापर चुकीच्या कामांसाठी करु शकतो. त्यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून असे मेसेज आल्यास त्याकडे दुर्लक्ष करा आणि संबंधित नंबर ब्लॉक करा किंवा याची तक्रार सायबर गुन्हे शाखेकडे करा.

Whatsapp Cyber Crime Alert l तुम्हाला असे मेसेज आल्यास काय करावे? : 

एवढेच नव्हे तर तुम्हाला असे मेसेज आल्यास काय करावे याबाबत प्रोसेस सांगतांना सायबर तज्ज्ञ ॲड. प्रशांत माळी यांनी सांगतले कि.. (Whatsapp Cyber Crime Alert)

– तुम्हाला येणाऱ्या अनोळखी नंबरला कोणत्याही प्रकारचा रिप्लाय देऊ नका.
– अनोळखी नंबरवरून आलेल्या अशा मेसेजकडे दुर्लक्ष करा अथवा तो नंबर थेट ब्लॉक करा.
– तसेच अनोळखी नंबरवरून येणाऱ्या मेसेजमध्ये लिंक अथवा फोटो असल्यास त्यावर क्लिक करु नका. असे केल्यास तुमचा डेटा हॅक होण्याची भीती वाढण्याची शक्यता असते.
– तसेच महत्वाचे म्हणजे तुमच्या मोबाईलच्या प्रायव्हसी सेटिंग्स बदलून सर्वात आधी तुमचा डेटा सुरक्षित करा.

महत्वाच्या बातम्या :

Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’ 

Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत

IND vs AFG T20 Squad l अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! या खेळाडूवर सोपवली संघाची धुरा

Boycott Maldives Hashtag l मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर Boycott Maldives हा हॅशटॅग ट्रेंड; यामागचे नेमके कारण काय?

Team India | अखेर ट्वेंटी-20 संघात रोहित-विराटची एन्ट्री; वर्ल्ड कपची तयारी सुरू?