Ambati Rayudu | वन डे विश्वचषक 2019 पासून अंबाती रायुडू सर्वप्रथम प्रसिद्धीच्या झोतात आला. तेव्हा त्याला विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने रायुडूने संतप्त प्रतिक्रिया दिली होती. रायुडू सध्या नाट्यमय घडामोडींमुळे चर्चेत आहे. अलीकडेच त्याने राजकारणात प्रवेश केला होता. मात्र, दहा दिवसांतच राजकारणातून तूर्त ब्रेक घेत असल्याचे त्याने जाहीर केले अन् चाहते बुचकळ्यात पडले. अशातच आता त्याने राजकारणातून बाजूला होण्याचे कारण सांगितले असून सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्टीकरण दिले आहे.
दरम्यान, रायुडूने काही दिवसांपूर्वी म्हणजेच 28 डिसेंबर रोजी युवाजन श्रमिका रिथू काँग्रेस पार्टीत प्रवेश केला होता. रायुडूने राजकारण कायमचे सोडले नसले तरी तो काही काळ राजकारणापासून दूर झाला आहे. अंबाती रायडूने 55 एकदिवसीय सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत.
रायुडू आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारख्या सर्वात यशस्वी संघांसोबत खेळला आहे. त्याने आयपीएलच्या 203 सामन्यात 4348 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे रायुडूने दोन्ही संघांकडून आयपीएलचे जेतेपद पटकावले. विश्वचषकातून वगळल्यानंतर रायुडूने शेवटचा एकदिवसीय सामना 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर रायडूने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
Ambati Rayudu ची राजकारणात एन्ट्री अन्…
अंबाती रायुडूने 28 डिसेंबर 2023 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांच्या उपस्थितीत YSRP पक्षात प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नारायण स्वामी आणि राजमपेटचे खासदार पी मिथुन रेड्डी यांची उपस्थिती होती. पण, क्रिकेटसाठी रायुडूने तूर्त राजकीय खेळपट्टीपासून बाजूला जायचे ठरवले.
… म्हणून राजकारणातून ब्रेक घेतला
वायएसआरपीमध्ये सामील झाल्यानंतर दहा दिवसांतच अंबाती रायुडूने राजकारणातून बाहेर पडत असल्याचे सांगितले. रायुडूने सोशल मीडियावर पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, तो मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीसोबत दुबईतील ILT20 स्पर्धेत भाग घेणार आहे. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेट खेळताना त्याला राजकीय संबंध सोडावे लागले. एकूणच व्यावसायिक खेळाडू असल्याने त्याने राजकारणातून ब्रेक घेतला आहे.
I Ambati Rayudu will be representing the Mumbai Indians in the upcoming ILt20 from jan 20th in Dubai. Which requires me to be politically non affiliated whilst playing professional sport.
— ATR (@RayuduAmbati) January 7, 2024
आयपीएलचा मागील वर्षीचा हंगाम रायुडूसाठी अखेरचा होता. त्याने आयपीएल 2023 नंतर आयपीएल क्रिकेटला अलविदा केला होता. 2023 च्या आयपीएलमध्ये रायुडू चेन्नई सुपर किंग्सच्या संघाचा भाग होता. चेन्नईने आयपीएलचा किताब जिंकून आपल्या स्टार खेळाडूला निरोप दिला.
Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’
Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत