Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरबद्दल आपण सर्वांनी ऐकले आहे. तुमची कोणतीही मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही बँकांनी दिलेल्या या सुविधेचा वापर करू शकता. त्यासाठी बँके ग्राहकांकडून पैसे घेते. बँक लॉकरमध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवता तेव्हा तुम्हाला बँकेकडून लॉकरची एक चावी दिली जाते. त्यानंतर तुमच्याशिवाय ते कोणीही उघडू शकत नाही. पण तुमची लॉकरची चावी हरवली तर काय होईल हे तुम्हाला माहीत आहे का? तर आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती सांगणार आहोत.

बँकेच्या लॉकरची चावी हरवली तर काय करावे? :

जर तुमच्या बँक लॉकरची चावी हरवली असेल, तर सर्वप्रथम बँकेला त्याची माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. यासोबतच तुम्हाला एफआयआरही दाखल करावी लागेल. तसेच जर लॉकर एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर असेल तर सर्व सबंधितांनी सही करू तसा अर्ज बँकेत (Lost Your Bank Locker Keys) सादर करावा लागतो. यानंतर लॉकर तोडण्यासाठी बँकेस परवानगी द्यावी लागते. लॉकर तोडण्याच्या वेळी संबंधित लॉकरचे सर्व लॉकर होल्डर, बँकेचा अधिकारी व पोलीस यांच्या समोर लॉकर तोडले जाते.

तसेच लॉकर तोडताना लॉकरमध्ये (Lost Your Bank Locker Keys) असलेल्या वस्तूंची माहिती इतरांना समजणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यानंतर जर तुम्हाला पुन्हा तेच लॉकर हवे असेल तर तुम्हाला लॉकरची दुसरी किल्ली दिली जाते किंवा बँक तुम्हाला दुसरे लॉकर जारी करू शकते. सर्वात महत्वाचं म्हणजे लॉकर ओपन करण्यासाठी येणार खर्च हा लॉकरधारकास करावा लागतो.

Lost Your Bank Locker Keys l अशा परिस्थितीत बँक स्वतः लॉकर फोडू शकते का?

SBI च्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या ग्राहकाने त्याच्या लॉकरचे भाडे सलग 3 वर्षे भरले नाही, तर बँक लॉकर तोडून भाडे वसूल करू शकते. तसेच जर लॉकर 7 वर्षे चालू राहिल्यास आणि ग्राहक या कालावधीत बँकेला भेट देत नसतील तर भाडे येत राहिले तरीही ते लॉकर तोडले जाऊ शकते.

बँकेचे लॉकर भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीवर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास आणि बँकेला किंवा पोलिसांना असे वाटले की, त्या व्यक्तीने लॉकरमध्ये गुन्ह्याशी संबंधित काही लपवले असेल तर ग्राहक नसतानाही लॉकर (Lost Your Bank Locker Keys) फोडले जाऊ शकते. या स्थितीत बँक अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारीही हजर असतात.

त्यामुळे जर तुम्ही देखील बँक लॉकरमध्ये पैसे किंवा मौल्यवान वस्तू ठेवत असाल तर काही कालावधीनंतर बँकेला भेट देत राहणे आवश्यक आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे बॅंक लॉकर किल्ली सुरक्षित ठेवणे. किल्ली गहाळ होणार नाही याही दक्षता घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू

Whatsapp Cyber Crime Alert l अलर्ट : तुम्हाला देखील WhatsApp वर ‘असा’ मेसेज आला आहे? वेळेवर व्हा सावधान अन्यथा…

Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’ 

Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत

IND vs AFG T20 Squad l अफगाणिस्तान विरुद्धच्या T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर! या खेळाडूवर सोपवली संघाची धुरा