Ram Mandir | राम मंदिरासाठी 30 वर्ष पाळलं मौन; 85 वर्षीय आजीबाईंचं अनोखं व्रत

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir | राम मंदिर म्हणजे तमाम भारतीयांसाठी जिव्हाळ्याचा विषय… उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिर व्हावं यासाठी अनेक पिढ्यांनी संघर्ष केला. किंबहुना देशाचं राजकारण देखील या विषयाभोवती फिरत राहिलं. मात्र, आता मोठ्या संघर्षानंतर अयोध्येत राम मंदिर होत आहे, त्यामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. शबरीच्या श्रद्धेने प्रभू श्रीरामाला त्यांच्या झोपडीत आणले होते, असे सांगितले जाते. असेच काहीसे झारखंडच्या धनबाद येथील एका आजीबाईंच्या ध्यानी मनी आहे.

खरं तर या आजीबाईंनी अयोध्येत राम मंदिर व्हावं यासाठी तब्बल 30 वर्ष मौन व्रत केलं आहे. सरस्वती अग्रवाल यांनी सांगितले की, त्या 22 जानेवारीला अयोध्येला जाऊन मौनव्रत मोडणार आहेत. करमतांड येथील रहिवासी 85 वर्षीय सरस्वती अग्रवाल यांनी 30 वर्षांपूर्वी मौनव्रत सुरू केले होते. अयोध्येत राम मंदिर बांधले जात नाही तोपर्यंत कोणाशीच बोलणार नाही, अशी शपथ त्यांनी घेतली होती.

Ram Mandir अनोखं व्रत

पण आता अयोध्येत भव्य राम मंदिर होत असल्याचे पाहून एक वेगळेच समाधान असल्याचे त्या सांगतात. 22 जानेवारीला अयोध्येतील भगवान श्री राम मंदिराच्या अभिषेक दिनी सरस्वती या ‘राम, सीताराम’ म्हणत मौनव्रत तोडणार आहेत. प्रभू रामाच्या चरणी आपले जीवन समर्पित करणाऱ्या सरस्वती अग्रवाल आपला बहुतांश वेळ अयोध्येत घालवतात.

दरम्यान, मंदिराच्या उभारणीमुळे त्या खूप खूश आहेत. सरस्वती अग्रवाल सांगतात की, अयोध्येत राम मंदिर होत असल्याचे पाहून माझे आयुष्य धन्य झाले आहे. रामलला यांनी मला प्राण प्रतिष्ठामध्ये सहभागी होण्यासाठी बोलावले आहे. माझी तपश्चर्या आणि ध्यान याचे फळ मला मिळते आहे.

30 वर्षांनंतर मौन तोडणार

तब्बल 30 वर्षांनंतर माझे मौन ‘रामनाम’ म्हणून तोडणार आहे. सरस्वती अग्रवाल मे 1992 मध्ये अयोध्येला गेल्या होत्या. तिथे त्यांनी रामजन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्य गोपाल दास यांची भेट घेतली. मग त्यांनी चित्रकूटला प्रस्थान केले. त्यांनी केवळ ग्लासभर दूध पित कल्पवासात सात महिने काढले. तसेच कामठानाथ पर्वताची दररोज 14 किमी प्रदक्षिणा केली. परिक्रमा करून अयोध्येला पोहचल्यानंतर त्यांनी 6 डिसेंबर 1992 रोजी स्वामी नृत्य गोपाल दास यांची भेट घेतली. त्यांच्या प्रेरणेनेच मौनव्रत पाळल्याचे त्या सांगतात. राममंदिराचा अभिषेक होईल त्यादिवशी मौन तोडणार असल्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

65 वर्षांपूर्वी सरस्वती अग्रवाल यांचा विवाह देवकीनंदन अग्रवाल यांच्याशी झाला होता. सरस्वती यांचे पती आता हयात नाहीत. तसेच त्यांनी कधीच शिक्षण घेतले नाही. त्यांच्या पतीनेच त्यांना अक्षरांचे ज्ञान दिले होते. त्यानंतर पुस्तकं बघून त्या लिहण्यात आणि वाचण्यात पारंगत झाल्या. सरस्वती या रोज राम चरित मानस आणि इतर धार्मिक ग्रंथांचे वाचन करतात. त्यांच्या पतीचे 35 वर्षांपूर्वी निधन झाले. विशेष बाब म्हणजे सरस्वती अग्रवाल मौन सोडणार हे कळताच त्यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले.

Boycott Maldives Hashtag l मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर सोशल मीडियावर Boycott Maldives हा हॅशटॅग ट्रेंड; यामागचे नेमके कारण काय?

Team India | अखेर ट्वेंटी-20 संघात रोहित-विराटची एन्ट्री; वर्ल्ड कपची तयारी सुरू?

Team India ची विजयी सलामी पण पाहुण्यांच कमबॅक; दुसऱ्या सामन्यात भारत चीतपट

Shakib Al Hasan बनला खासदार! विजयाचं सेलिब्रेशन अन् चाहत्याच्या दिली कानशिलात, VIDEO

Aditya Thackeray विदर्भाकडून मैदानात; रणजी ट्रॉफीचा थरार सुरू!