मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला आहे. काहीजण खड्ड्यावजवळ जातात आणि सेल्फी काढतात, पण मला असली नौटंकी आवडत नाही, असा टोला अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना लगावला आहे.
Ajit Pawar यांचा सुप्रिया सुळेंना टोला
मुंबईत राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाकडून राष्ट्रवादीच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी अजित पवार बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवारांनी (Ajit Pawar) विविध विषयांवर भाष्य केलं. तसेच अजित पवारांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. याउलट सुप्रिया सुळेंनी मात्र अजित पवारांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या कामाचा दाखला देत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
अजित पवारांच्या कामाची स्टाईल मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) उचलली आहे. सकाळी 7 वाजता अजित पवार काम करताना दिसतात आणि अजितदादा सकाळी उठून कामं करतात तेच मुख्यमंत्र्यांनी आज हेरलं, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांचं कौतुक केलं.
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादा गटाने भाजपशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजितदादा गट सत्तेत सामीलही झाला. त्यानंतर अजितदादा गटाने थेट सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगात धाव घेऊन पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावाही केला.
या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर हल्ला करण्याची एकही संधी सोडली नाही. अजित पवारांनी भाजपसोबत घरोबा केल्यापासून अनेकवेळा शरद पवारांवर अत्यंत खोचक शब्दात टीका केली आहे.
दरम्यान, एकीकडे अजित पवार शरद पवार गटावर टीका करताना दिसतात. तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी मात्र अजित पवारांचं कौतुक केल्याने आश्चर्य व्यक्त केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला
Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!
Aprilia RS 457 l बाइकप्रेमींनो… Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाईक धुमाकूळ घालण्यास सज्ज