Aishawarya Rai आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाबाबत मोठी बातमी समोर!

Aishwarya Rai | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishawarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्याबदल खूपच चर्चा रंगल्या आहेत. ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. शिवाय या दोघांच्या नात्याबदल रोज नवनवीन खुलासे बाहेर येत आहेत. या सगळ्या गोष्टी सुरु असताना एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काय आहे नेमका प्रकार?

ऐश्वर्या (Aishawarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यामध्ये काही तरी बिनसलं आहे अशा चर्चा आहेत. शिवाय ऐश्वर्याने अभिषेक बच्चनचं घरं सोडल्याचं देखील म्हटलं जात आहे. दरम्यान सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बच्चन कुटुंब कबड्डी सामन्या दरम्यान दिसलं होतं. यावेळी बच्चन कुटुंब या ठिकाणी एकत्रितपणे आनंद घेताना दिसलं.

घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम?

मुंबई लीगच्या पहिल्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सचा विजय पाहण्यासाठी ऐश्वर्या राय (Aishawarya Rai), अभिषेक बच्चन, लेक आराध्या, आणि अमिताभ बच्चन देखील हजर होते. त्यामुळे ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला.

दुसरीकडे ऐश्वर्याच्या लेकीला तिच्या नव्या लूकमुळे ट्रोल केलं जातंय. दरम्यान, या वेळेस कबड्डी सामना पाहण्यासाठी आलेली आराध्या तिच्या नव्या लूकमुळे चांगलीच चर्चेत आली. सोशल मीडियावर आराध्याला तिच्या नव्या लूकसाठी नेटकऱ्यांनी कमेंट देखील केल्या.

अभिषेकचा नवा चित्रपट-

अभिषेकच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, अभिषेकने बाॅलिवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केलं आहे. शिवाय ऐश्वर्या राय बरोबरसुद्धा त्यांने अनेकवेळा स्क्रिन शेअर केली आहे. सध्या अभिषेकने तीन चित्रपटात काम केलं आहे. येत्या काही दिवसांत अभिषेक बच्चन ‘हेरा फेरी 3’, ‘द बिग बुल 2’ आणि ‘बी हॅप्पी’मध्ये दिसणार आहे.

News Title : aishawarya rai and abhishek divorce big update

महत्त्वाच्या बातम्या-

Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला

Golden Globe Awards 2024 l गोल्डन ग्लोब पुरस्कार पटकावणाऱ्या विजेत्यांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर!

Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!

Aprilia RS 457 l बाइकप्रेमींनो… Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाईक धुमाकूळ घालण्यास सज्ज

Post Office Scheme 2024 l पोस्टाची ही योजना तुम्हाला करणार करोडपती! कमी गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा