Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!

नवी दिल्ली | सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने दिलेला निर्णय रद्द केला आहे. बिल्किस बानो (Bilkis Bano) प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारचा निर्णय फिरवत दोषींची शिक्षा रद्द केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आता दोषींना पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे.

सुप्रीम कोर्टाने आपल्या निर्णयात म्हटलंय की, जिथे गुन्हेगारावर खटला चालवला गेला आहे आणि शिक्षा झाली आहे, फक्त राज्यच दोषींना माफी देण्याचा निर्णय घेऊ शकतं. सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की, गुजरात सरकार दोषींची शिक्षा माफ करण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीतर महाराष्ट्र सरकार यावर निर्णय घेईल. बिल्किस बानो प्रकरणाची महाराष्ट्रात सुनावणी झाली हे विशेष.

सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला झटका

दोषींना सोडण्याचा गुजरात सरकारचा निर्णय म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे. गुजरात सरकारने बिल्किस बानो सामूहिक बलात्कारातील 11 आरोपींची शिक्षा माफ केली होती.

गुजरात सरकारच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं, त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी केली आणि 12 ऑक्टोबर 2023 रोजी निकाल राखून ठेवला.

गुजरात सरकारच्या कर्जमाफी धोरणांतर्गत, 2022 मध्ये, बिल्किस बानोवर सामूहिक बलात्कार आणि तिच्या कुटुंबातील सात सदस्यांची हत्या या दोषींची शिक्षा माफ करण्यात आली आणि त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोषींना पुन्हा तुरुंगात जावे लागणार आहे. या दोषींना 2008 मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती, जी मुंबई उच्च न्यायालयानेही मंजूर केली होती.

Bilkis Bano प्रकरण काय?

2002 मध्ये गोध्रा स्टेशनजवळ साबरमती एक्स्प्रेसचे काही डबे जाळण्यात आले होते. या घटनेत अयोध्येहून परतणाऱ्या 59 कारसेवकांचा मृत्यू झाला होता. गुजरातमध्ये दंगली उसळल्या. याच दंगलीच्या आगीत बिल्किस बानो यांचं कुटुंब पुरतं होरपळून निघालं. बिल्किस बानो यांच्या कुटुंबावर ज्यांनी हल्ला चढवला. त्यांनी बिल्किस बानो, त्यांची आई आणि कुटुंबातील इतर तीन महिलांवर बलात्कार केला होता.

महत्त्वाच्या बातम्या- 

Mumbai Crime l मुंबई पोलीस दलात 8 महिला पोलिसांसोबत सेक्स स्कँडलच्या आरोपांनी खळबळ, पत्र पाठवणाराचा शोध सुरु

Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम

Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू

Whatsapp Cyber Crime Alert l अलर्ट : तुम्हाला देखील WhatsApp वर ‘असा’ मेसेज आला आहे? वेळेवर व्हा सावधान अन्यथा…

Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’