Aprilia RS 457 l बाइकप्रेमींनो… Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाईक धुमाकूळ घालण्यास सज्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aprilia RS 457 l Piaggio Vehicles Pvt. Ltd. ची मूळ मालकी असलेल्या Aprilia या ऑटो कंपनीने मागील महिन्यात भारतामध्ये RS 457 हि बाईक लाँच केली होती. अशातच आता Aprilia RS 457 या बाईक संदर्भात मोठी अपडेट्स समोर आली आहे. आता या बाईकचे डिलिव्हरी 1 मार्च 2024 पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. म्हणजेच ग्राहकांना ही बाईक लवकरच खरेदी करता येणार आहे.

Aprilia RS 457 स्पेसिफिकेशन :

Aprilia RS 457 ला उर्जा देण्यासाठी, 457cc, लिक्विड-कूल्ड ट्विन-सिलेंडर इंजिन प्रदान करण्यात आले आहे, जे 47 bhp ची शक्ती आणि 48.8 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. या मोटरसायकलला राईड-बाय-वायर थ्रॉटल आणि पर्यायी क्विकशिफ्टरचाही फायदा होतो.

फुल्ली फेयर्ड स्पोर्ट्स बाईकला ट्विन-स्पार अ‍ॅल्युमिनियम (Aprilia RS 457) फ्रेम आहे जी रिव्हर्स्ड फ्रंट फोर्क्सवर सस्पेंशन आणि मागील मोनो-शॉकसह सुसज्ज आहे. या बाइकमध्ये ब्रेकिंग बद्दल बोलायचे झाले तर या स्पोर्ट्स बाइकमध्ये 320 मिमी फ्रंट डिस्क आणि 220 मिमी मागील डिस्क ब्रेक 4-पिस्टन कॅलिपरसह जोडलेले आहेत, तसेच हे दोन चॅनेल ABS सह सुसज्ज आहे. या बाईकला 17 इंच अलॉय व्हील देखील देण्यात आहे. या बाईकचे वजन सुमारे 175 किलो आहे.

Aprilia RS 457 बाईकचे वैशिष्ट्ये :

Aprilia RS 457 बाईकमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये RS 457 मध्ये पाच-इंच TFT कलर इंस्ट्रुमेंटेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, ऑल-एलईडी लाइटिंग, बॅकलिट स्विचगियर आणि तीन राइडिंग मोड आहेत. सुरक्षेसाठी यात ट्रॅक्शन कंट्रोल देखील आहे.

तसेच ही बाईक RS 660 आणि RS V4 सारख्या मोठ्या एप्रिलिया स्पोर्ट्स (Aprilia RS 457) बाईकपासून प्रेरित आहे ज्यामध्ये पूर्णतः फेअर बॉडी, ट्विन एलईडी हेडलॅम्प सेटअप, स्प्लिट सीट्स आणि फ्लोटिंग टेल सेक्शन आहेत.

या बाईकची कित्येक दिवसांपासून चर्चा होती. अखेर ती बाईक लवकरच बाजारात (Aprilia RS 457) सादर करण्यात येणार आहे. कंपनीने या बाईकची एक्स-शोरूम किंमत 4.10 लाख रुपये आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे या नवीन स्पोर्ट्स बाईकचे उत्पादन महाराष्ट्रातील बारामती येथे सुरू केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Post Office Scheme 2024 l पोस्टाची ही योजना तुम्हाला करणार करोडपती! कमी गुंतवणुकीवर मिळणार जबरदस्त परतावा

Mumbai Crime l मुंबई पोलीस दलात 8 महिला पोलिसांसोबत सेक्स स्कँडलच्या आरोपांनी खळबळ, पत्र पाठवणाराचा शोध सुरु

Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम

Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू

Whatsapp Cyber Crime Alert l अलर्ट : तुम्हाला देखील WhatsApp वर ‘असा’ मेसेज आला आहे? वेळेवर व्हा सावधान अन्यथा…