Post Office Scheme 2024 l सर्वसामान्य लोक गुंतवणूक करताना जास्त जोखीम घेणे टाळतात. अशावेळी गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या विवीध योजनांमध्ये पैसे गुंतवतात. पोस्ट ऑफिसची अशीच सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. या योजनेमध्ये फक्त भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेत गुंतवणूक केल्यास किती व्याजदर मिळू शकतो याबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊयात..
PPF योजनेतील गुंतवणुकीवर मिळणार इतका व्याजदर :
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेत तुम्हाला 7.1 टक्के दराने व्याज दिले जात आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत कुठेही पीपीएफ खाते उघडू शकता. यामध्ये तुम्हाला चक्रवाढीचा फायदा देखील मिळतो. नियमांनुसार, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजनेत गुंतवणूक कमीत कमी 500 रुपयांपासून सुरू केली जाऊ शकते, तर तुम्ही दरवर्षी जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करू शकता.
PPF ही योजना 15 वर्षांसाठी आहे, परंतु तुम्ही ती 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये वाढवू शकता. जर तुम्ही PPF मध्ये दरवर्षी 1.5 लाख रुपये सतत 15 वर्षे गुंतवले तर तुमची एकूण गुंतवणूक 22,50,000 रुपये होईल, परंतु 7.1 टक्के व्याजासह तुम्हाला एकूण 40,68,209 रुपये मिळतील. (Post Office Scheme 2024)
Post Office Scheme 2024
जर तुम्हाला 5 वर्षांच्या ब्लॉकमध्ये एकदाच मुदतवाढ (Post Office Scheme 2024) मिळाली आणि तीच गुंतवणूक पुढील 5 वर्षांसाठी चालू ठेवली तर तुम्ही 20 वर्षांत एकूण 30,00,000 रुपये गुंतवाल. 7.1 नुसार, तुम्हाला 36,58,288 रुपये व्याज म्हणून मिळतील आणि मॅच्युरिटीवर तुम्हाला एकूण 66,58,288 रुपये मिळतील.
Post Office Scheme 2024 l PPF योजना नियम व अटी :
– PPF योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
– पीपीएफ विस्तारासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमचे खाते असलेल्या बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अर्ज सबमिट करावा लागेल. तुम्हाला PPF योजनेचा अर्ज मॅच्युरिटीच्या दिलेल्या तारखेपासून 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी द्यावा लागणार आहे.
– जर तुमच्या अर्जावरील PPF खात्याचा कालावधी 5 वर्षांसाठी वाढवला तर तुम्हाला दरवर्षी कमीत कमी 500 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्ही ही किमान रक्कम जमा केली नाही तर तुमचे खाते बंद केले जाईल. मात्र खाते पुन्हा सुरू करण्यासाठी तुम्हाला प्रति वर्ष 50 रुपये दंड भरावा लागेल.
महत्वाच्या बातम्या :
Lost Your Bank Locker Keys l बँक लॉकरची चावी हरवली तर काय होईल? जाणून घ्या बँकेचे नियम
Ambati Rayudu | 10 दिवसांत राजकारण सोडण्याचं कारण ‘मुंबई इंडियन्स’ – रायुडू
Maldives India Issue | भारत आमचा विश्वासू मित्र आहे; भारताच्या समर्थनार्थ ‘बांगलादेश’