Nayanthara | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम मांसाहारी असल्याचा उल्लेख केला होता. यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. येत्या 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्धाटन होणार आहे. देशात राममय वातावरण असताना या विधानाने एकच खळबळ उडाली होती. नंतर आव्हाड यांनी आपल्या वक्तव्यावर खेदही व्यक्त केला होता. हे प्रकरण शांत होत नाही तेच आता एका चित्रपटामुळे पुन्हा नवा वाद होण्याची शक्यता आहे. साउथ अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यु करणारी अभिनेत्री नयनतारा (Nayanthara)आपल्या ‘अन्नपूर्णी’ या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटावर हिंदू धर्माच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच चित्रपट निर्मात्यांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
‘Annapoorani’ चित्रपटातील ‘त्या’ सीनमुळे वाद
शिवसेनेचे माजी नेते रमेश सोळंकी यांनी नयनतारा (Nayanthara) आणि चित्रपट निर्मात्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. त्यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे.”मी हिंदूविरोधी नेटफ्लिक्सविरोधात तक्रार दाखल केली आहे. चित्रपट निर्मात्यांनी प्रभू श्रीरामाचा अपमान केला आहे. हा हिंदुविरोधी चित्रपट आहे. कारण यात एका दृश्यात प्रभू श्रीराम यांना ‘मांसाहारी’ म्हटले आहे.”, असे रमेश सोळंकी यांनी म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हे प्रकरण तापलं आहे.
तसेच हा चित्रपट लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बनवण्यात आला असून या प्रकरणी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नेटफ्लिक्स इंडिया स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मसह निर्मात्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची आणि एफआयआर नोंदवण्याची मागणीही रमेश सोळंकी यांनी केली आहे.
Nayanthara विरोधात FIR
रमेश सोलंकी (Ramesh Solanki) यांनी चित्रपटातील संवाद आणि काही दृश्यांवरही आक्षेप घेतला आहे. या चित्रपटात अभिनेता फरहानने अभिनेत्रीला भगवान श्री राम देखील मांस खात असल्याचे सांगून मांस खाण्यास प्रवृत्त केले असल्याचा सीन दाखवण्यात आला आहे. त्यामुळे ‘अन्नपूर्णी’या चित्रपटाच्या प्रदर्शनावरही आता विरोध केला जात आहे.
दरम्यान, रमेश सोळंकी यांनी ‘अन्नपूर्णी’ चित्रपटाचे दिग्दर्शक नीलेश कृष्णा, अभिनेत्री नयनतारा (Nayanthara), निर्माते जतिन सेठी, आर रवींद्रन आणि पुनित गोएंका, झी स्टुडिओचे मुख्य व्यवसाय अधिकारी शारिक पटेल आणि नेटफ्लिक्स इंडियाचे प्रमुख मोनिका यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे.
News Title- FIR filed against Nayanthara
महत्वाच्या बातम्या :
Malaika Arora | मलायका आणि अर्जुन कपूरचं ब्रेकअप?; अखेर खुलासा झाला
Bilkis Bano प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा गुजरात सरकारला मोठा झटका!
Aprilia RS 457 l बाइकप्रेमींनो… Aprilia RS 457 स्पोर्ट्स बाईक धुमाकूळ घालण्यास सज्ज