Team India | सगळेच प्यायचे पण नाव माझं बदनाम झालं; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Team India | भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमारनं एक धक्कादायक दावा केला आहे. दिग्गज सचिन तेंडुलकरसह महेंद्रसिंग धोनीचा सहकारी राहिलेला कुमार त्याच्या या दाव्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आला. संघातील सर्वच सहकारी प्यायचे पण नाव मात्र माझं बदनाम झालं, असं त्यानं सांगितलं. प्रवीण कुमारची क्रिकेट कारकीर्द फार काळ टिकली नाही. असं म्हटलं जातं की प्रवीण कुमार नेहमी मैदानाबाहेरच्याच समस्यांशी लढत राहिला.

प्रवीण कुमारची कारकीर्द व्यसनामुळे संपली असल्याचंही बोललं जातं. पण, आता खुद्द प्रवीणनं याबाबत भाष्य केलं असून एक मोठा खुलासा केला आहे. भारताच्या या माजी खेळाडूनं आपल्या वक्तव्यानं सर्वांना आश्चर्यचकित केलं. त्यानं महेंद्रसिंग धोनी आणि सचिन तेंडुलकर यांसारख्या दिग्गजांसोबत ड्रेसिंग रूम शेअर केलं आहे.

Team India । प्रवीण कुमारचा मोठा खुलासा

प्रवीण कुमारनं सांगितलं की, लोकांनी माझी प्रतिमा वाईट बनवली आहे, पण वास्तव काही वेगळेच आहे. जेव्हा मी भारतीय संघाचा भाग होतो तेव्हा संघातील वरिष्ठ खेळाडू म्हणायचे की मद्यपान करू नको, हे करू नको, असे करू नको… पण प्रत्येकजण ते करत असे. पण, ही गोष्ट बाजूला राहिली आणि केवळ मी बदनाम झालो. सर्वच सहकारी प्यायचे पण नाव फक्त माझं बदनाम झालं.

दरम्यान, प्रवीण कुमारनं अलीकडेच दिलेली मुलाखत फार गाजत आहे. यामध्ये त्यानं काही गौप्यस्फोट केले असून पाकिस्तान आणि भारत या सामन्याविषयी देखील भाष्य केलं. प्रवीण कुमार जेव्हा भारतीय संघाचा भाग होता, तेव्हा भारतीय संघात सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि सौरव गांगुलीसारखे दिग्गज खेळाडू होते.

Praveen Kumar चा गौप्यस्फोट

प्रवीण कुमारला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. प्रवीण कुमारनं अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत एक नाव घ्यायचं टाळलं. भारतीय संघातील कोणत्या वरिष्ठ खेळाडूनं मद्यपान न करण्याचा सल्ला दिला होता? असा प्रश्न केला असता त्यानं म्हटलं, “होय, दिला होता पण मला कॅमेऱ्यासमोर त्याचं नाव घ्यायचं नाही.”

मैदानाबाहेरील तापट स्वभाव प्रवीण कुमारला नडला. तो प्रचंड दारू प्यायचा असे अनेक वृत्तांमध्ये नमूद आहे. याबद्दल बोलताना तो म्हणतो, “मी भारतीय संघाचा भाग होतो, तेव्हा वरिष्ठ खेळाडू मला नेहमी ड्रिंक्स न करण्याचा सल्ला द्यायचे… हे करू नको, ते करू नको अशा सूचना करायचे. पण तेच मला सांगायचे की, ड्रिंक्स तर सगळेच करतात… पण नाव मात्र फक्त माझं बदनाम झालं.”

प्रवीण कुमार 2007 ते 2012 पर्यंत भारतीय संघाकडून खेळला होता. या कालावधीत 6 कसोटी सामन्यांव्यतिरिक्त, प्रवीण कुमारनं 68 एकदिवसीय आणि 10 ट्वेंटी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. प्रवीण कुमार आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीचा भाग होता.

Devara Part-1 Teaser Release | Junior NTR चे खतरनाक अ‍ॅक्शन सिन्स; ‘या’ दिवशी रिलीज होणार Devara

TIGER 3 | सलमान खानच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, आता…

Nayanthara | अभिनेत्री नयनतारा मोठ्या अडचणीत?; नव्या वादाला तोंड फुटणार

Sharad Mohol | “खचून जाऊ नका, तर…”, शरद मोहोळच्या कार्यकर्त्यांना नितेश राणेंचा मोठा सल्ला

Sharad Mohol | माझा नवरा हा वाघ होता आणि मी वाघीण आहे- स्वाती मोहोळ