Football विश्वावर शोककळा! दोनदा जगज्जेता राहिलेल्या महान जर्मन खेळाडूचे निधन

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Football | जर्मनीच्या फुटबॉल विश्वातील तारा म्हणजेच फुटबॉलपटू फ्रांझ बेकनबॉअर… (franz beckenbauer) एक खेळाडू आणि त्यानंतर प्रशिक्षक म्हणून जर्मनीला विश्वचषक जिंकून देणारे महान फुटबॉलपटू फ्रांझ बेकनबॉअर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Franz Beckenbauer dead aged 78) फुटबॉल विश्वातील दिग्गजाच्या निधनामुळे शोककळा पसरली आहे. बेकनबॉअर यांच्या निधनाची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच आम्हाला आताच्या घडीला कोणताही प्रश्न न विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

Football विश्वावर शोककळा!

“फ्रांझ बेकनबाऊर यांचे काल (रविवार) निधन झाल्याचे जाहीर करताना आम्हाला अतिशय दुःख होत आहे”, असे त्यांच्या कुटुंबीयांनी जर्मन वृत्तसंस्था डीपीएला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र, या निवेदनात मृत्यूचे कारण नमूद करण्यात आलेले नाही. बेकनबॉअर यांनी 1974 मध्ये संघाचे नेतृत्व करून पश्चिम जर्मनीला विश्वविजेते बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.

1990 च्या विश्वचषक फायनलमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवणाऱ्या राष्ट्रीय संघाचेही त्यांनी प्रशिक्षकपद भूषवले. जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंमध्ये त्यांची गणना होते. एकूणच आपल्या संघाला दोनवेळा जगज्जेता बनवण्यासाठी बेकनबॉअर यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

Franz Beckenbauer यांचे निधन

आपल्या सहकाऱ्याचे निधन झाल्याचे कळताच जर्मनीच्या मुख्य प्रशिक्षकांनी शोक व्यक्त केला. जर्मनी संघाचे मुख्य प्रशिक्षक ज्युलियन नागेल्समन म्हणाले की, माझ्यासाठी फ्रांझ बेकेनबॉअर हा जर्मन इतिहासातील सर्वोत्तम फुटबॉलपटू होता. त्याच्या भूमिकांमुळे अनेकदा गेम बदलला आहे, ही भूमिका आणि बॉलशी त्याची मैत्री त्याला एक मुक्त माणूस बनवते. तो आधी फुटबॉलपटू आणि नंतर प्रशिक्षक म्हणून उत्कृष्ट शिलेदार होता.

फ्रांझ बेकनबॉअर यांनी त्यांच्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत एकूण 109 गोल केले, त्यापैकी 64 हे बायर्न म्युनिखसाठी त्यांच्या 439 सामन्यांमध्ये आले. बेकनबॉअर ज्या संघाचा भाग राहिले त्या संघाने चमकदार कामगिरी केली. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी पश्चिम जर्मनीसाठी 14 गोल केले आहेत.

बायर्न म्युनिखच्या अप्रतिम कामगिरीत त्यांची उल्लेखणीय भूमिका राहिली. बेकनबॉअर बायर्न म्युनिखचा भाग असताना संघाने बुंडेसलीगा स्पर्धेत पाचवेळा विजय संपादन केला. चारवेळा जर्मन कप पटकावला. तसेच 1974 ते 1976 पर्यंत संघाला सलग तीन युरोपियन चषक जिंकवून देण्यात फ्रांझ यांचा हात होता. त्यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द देखील तितकीच प्रभावी होती.

Kangana Ranaut लोकसभा निवडणूक लढवणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

IPL 2024 गाजवण्यासाठी Hardik Pandya सज्ज; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा Video Viral

Rohit Sharma आणि Virat नाही! लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडेल? दिग्गजानं सांगितलं नाव

Arjuna Award | “लोकांचं सगळं आयुष्य जातं पण…”, पुरस्कार जिंकताच शमी भावूक

Team India | सगळेच प्यायचे पण नाव माझं बदनाम झालं; भारताच्या माजी खेळाडूचा खुलासा