MLA Disqualification Case l आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MLA Disqualification Case l गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठया उलाढाली होत आहेत. अशातच राजकारणातील सर्वात महत्वाचा आणि चर्चेत असलेला शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्यापही लागलेला नाही. याबातच आता एक महत्वपूर्ण अपडेट्स हाती आली आहे. येत्या 10 जानेवारी 2024 ला शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

MLA Disqualification Case l राहुल नार्वेकर यांच्या निकालावर राज्याचं लक्ष :

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकालाचा निर्णय अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. महत्वाचं म्हणजे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हा निकाल देणार आहेत. राहुल नार्वेकर यांच्या निकालावर शिंदे गटासह ठाकरे गटाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे या निकालाकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे.

यापार्श्वभूमीवर प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यामध्ये त्यांनी दहाव्या परिशिष्टाचा संदर्भ दिला आहे. या संदर्भानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असल्याचे सांगण्यात आले आहे.

नेमका कोणता निकाल लागणार आधी?

शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट या दोनही गटांकडून (MLA Disqualification Case) एकमेकांविरोधात आमदारांना नोटीस बजावण्यात आली होती. त्याची एकत्रित सुनावणी ही विधानसभा स्पीकर समोर पार पडली होती. मात्र या सर्वच बाबींचा विचार करता येत्या दोन दिवसात अपेक्षित निकाल येईल असे वकील उज्ज्वल निकम म्हणाले आहेत.

वकील उज्वल निकम यांच्या म्हणण्यानुसार 16 आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती ती दहाव्या परिशिष्टानुसार वैध आहे की अवैध आहे हा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (MLA Disqualification Case) घेऊ शकतात.

तसेच माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो असे निकम म्हणाले आहेत. त्यामुळे सर्वात प्रथम हा निर्णय लागण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही बाब पहिल्यांदा तपासून बघण्याची आवश्यकता आहे असं वकील निकम म्हणाले आहेत.

MLA Disqualification Case l तसेच शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्रतेची बजावलेली नोटीस दिली होती. त्या नोटीस मधील मजकूर हा दहाव्या परिशिष्टानुसार ग्राह्य येतोय हे महत्वाचं असणार आहे. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचं काऊंटडाऊन सुरू झालं असल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या घडामोडी :

Football विश्वावर शोककळा! दोनदा जगज्जेता राहिलेल्या महान जर्मन खेळाडूचे निधन

Kangana Ranaut लोकसभा निवडणूक लढवणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

IPL 2024 गाजवण्यासाठी Hardik Pandya सज्ज; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा Video Viral

Rohit Sharma आणि Virat नाही! लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडेल? दिग्गजानं सांगितलं नाव

Arjuna Award | “लोकांचं सगळं आयुष्य जातं पण…”, पुरस्कार जिंकताच शमी भावूक