Maldives India | पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं भारताला समर्थन; एका शब्दाची पोस्ट Viral

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Maldives India | मालदीव सरकारविरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. मालदीव सरकारमधील मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविषयी अपशब्द वापरल्याने वाद चिघळला. प्रकरण वाढत असल्याचे लक्षात येताच मालदीव सरकारने संबंधित तीन मंत्र्यांची हकालपट्टी केली. मोदी यांच्या विरोधात चुकीची टिप्पणी करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांना मालदीव सरकारने निलंबित केले असले तरी यासंदर्भात सुरू झालेला वाद संपताना दिसत नाही. या वादात विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी उडी घेतली.

खासकरून या वादात भारतीय क्रीडा आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटींनी मोदींच्या समर्थनार्थ आवाज उठवला. अशातच आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू देखील मोदींच्या समर्थनार्थ आला आहे. भारतीय संघाच्या आजी माजी खेळाडूंनी देखील मालदीव सरकारचा निषेध केला.

Maldives India वाद चिघळला

सचिन तेंडुलकर, सुरेश रैना, हार्दिक पांड्या, इरफान पठाण, व्यंकटेश प्रसाद आणि वीरेंद्र सेहवाग अय्यर यांसह आणखी काही खेळाडूंनी मालदीव सरकारला सुनावले. याशिवाय बॉलिवूड कलाकारांनी देखील भारताच्या अपमानाविरोधात आवाज उठवला. तसेच आपल्या देशातील पर्यटन उद्योगाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू दानिश कनेरियाने सोशल मीडियावर मोदींचे समर्थन करणारी पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एकच शब्द लिहिला असला तरी हा एक शब्द सर्वकाही सांगणारा आहे. खरं तर या पोस्टमध्ये त्याने आगीच्या इमोजीसह ‘लक्षद्वीप’ चा उल्लेख केला आहे.

 

कसा सुरू झाला वाद?

4 जानेवारीला लक्षद्वीप भेटीचे काही फोटो शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना परदेशाऐवजी लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अवघ्या एक-दोन दिवसांनी मालदीवच्या काही मंत्र्यांनी नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली.

मालदीव सरकारमधील तत्कालीन मंत्र्यांनी वापरलेल्या भाषेमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला. मालदीवमधील खासदारांनी देखील याप्रकरणी नाराजी व्यक्त केली. तसेच मालदीव सरकारने भारताची माफी मागायला हवी असे म्हटले. भारतीयांचा अपमान केल्यामुळे हजारो लोकांनी मालदीवचा दौरा रद्द केला. वाढता वाद पाहून मालदीव सरकारने आपल्या मंत्र्यांना निलंबितही केले.

MLA Disqualification Case l आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

Football विश्वावर शोककळा! दोनदा जगज्जेता राहिलेल्या महान जर्मन खेळाडूचे निधन

Kangana Ranaut लोकसभा निवडणूक लढवणार? अभिनेत्रीचा मोठा खुलासा

IPL 2024 गाजवण्यासाठी Hardik Pandya सज्ज; मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराचा Video Viral

Rohit Sharma आणि Virat नाही! लाराचा वर्ल्ड रेकॉर्ड कोण तोडेल? दिग्गजानं सांगितलं नाव