Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Gautam Adani l सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाल्यानंतर गौतम अदानी अॅक्शन मूडमध्ये आहेत. अदानी समूहाच्या मालकीच्या ACC लिमिटेडने सोमवारी एशियन कॉंक्रिट आणि सिमेंट्स प्रायव्हेट लिमिटेडमधील उर्वरित 55% हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली (Gutam Adani) आहे. या स्टेकची किंमत 425.96 कोटी रुपये आहे. एसीसीकडे कंपनीत आधीच 45 टक्के हिस्सा आहे. अशाप्रकारे एसीसीची आता एसीसीपीएलमध्ये 100 टक्के भागीदारी आहे.

या ठिकाणी आहे कंपनीचे प्लांट (Gautam Adani) :

एशियन काँक्रीट आणि सिमेंटचा हिमाचल प्रदेशातील नालागढ येथे 13 लाख टन वार्षिक क्षमतेचा कारखाना आहे. त्याची उपकंपनी Asian Fine Cements Private Limited (AFCPL) चा पंजाब येथील राजपुरा येथे वार्षिक 15 लाख टन क्षमतेचा प्लांट उपलब्ध आहे.

अदानी समूहाने (Gautam Adani) गेल्या वर्षी एसीसीचे अधिग्रहण पूर्ण केले. गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी हा व्यवसाय पाहत आहे. त्यामुळे आता अदानी समूहाचा या कंपनीत देखील बोलबाला दिसणार आहे.

Gautam Adani l बोर्डाने दिली मान्यता :

कंपनीच्या बोर्डाने सोमवार म्हणजेच 8 जानेवारीला झालेल्या बैठकीत (Gautam Adani) एसीसीपीएलच्या खरेदीला मान्यता दिली होती. ACC लिमिटेडचे ​​मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कपूर म्हणाले, ‘या संपादनासह आम्ही आमचा विकासाचा मार्ग पुढे चालू ठेवत आहोत.

आमचा पोर्टफोलिओ समृद्ध करणे आणि आमच्या सर्व भागधारकांसाठी मूल्य निर्मितीच्या दिशेने आमच्या प्रवासाला गती देणे हा आहे. सोमवारी, एसीसी लिमिटेडचे ​​शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 0.89 टक्के किंवा 21.10 रुपयांच्या घसरणीसह 2356.25 रुपयांवर व्यवहार करताना दिसले.

या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2486.35 रुपये आहे. सध्या बीएसईवर कंपनीचे एम-कॅप 44,247.37 कोटी रुपये होते.

महत्वाच्या घडामोडी :

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा

Ather 450 Apex Vs OLA S1 Pro l देशात इलेक्ट्रिक स्कूटरला मागणी! या दोन स्कुटर एकमेकांशी करतील स्पर्धा

Maldives India | पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं भारताला समर्थन; एका शब्दाची पोस्ट Viral

MLA Disqualification Case l आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!

Football विश्वावर शोककळा! दोनदा जगज्जेता राहिलेल्या महान जर्मन खेळाडूचे निधन