Rain Alert l गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. काही ठिकाणी थंडीचे वातावरण आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. यामुळे राज्यातील हवामानात बदल दिसून येत आहेत. अशातच हवामान विभागाने एक महत्वपूर्ण अंदाज वर्तवला आहे. राज्यात येत्या 24 तासात अनेक भागात अवकाळी पावसाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. अवकाळी पावसाच्या संकटामुळे आता शेतकऱ्यांचं देखील टेंशन वाढलं आहे.
‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट (Yellow Alert) :
Rain Alert l बदलत्या हवामानामुळे पुढील 24 तास धोक्याचे असणार आहे. कारण राज्यातील काही भागात मेघगर्जना तर काही भागात तुरळक पाऊस होणार आहे. अशातच हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्याना अलर्ट देखील दिला आहे. आज विदर्भ, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची दाट शक्यता आहे. यासोबतच कोकणातही पावसाची तुरळक पाऊस पडणार आहे.
याशिवाय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, जळगाव, नाशिक, औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्याला यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे.
Rain Alert l अवकाळी पावसाचा या पिकांना धोका!
आज राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही भागात मध्यम व हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, द्राक्ष, आंबा, काजू, स्टोबेरी, तूर या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील 24 तास अवकाळी पावसाचे टेंशन असणार आहे.
अवकाळी पावसाच्या (Rain Alert) संकटामुळे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस नागरिकांना थंडीचा सामना करावा लागणार आहे. याशिवाय हवामानात बदल होत असल्याने राज्यात धुक्याची चादर पसरण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपूर्वी राज्यातील काही भागात माध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. यामध्ये अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा (Rain Alert) या जिल्ह्यांचा समावेश आहे.
महत्वाच्या घडामोडी :
Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी
Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा
Maldives India | पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं भारताला समर्थन; एका शब्दाची पोस्ट Viral
MLA Disqualification Case l आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वकील उज्ज्वल निकम यांचं मोठं वक्तव्य!