Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Property Tips l घर घेण्याचा विचार करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची… सध्याच्या काळात आपलं स्वतःचं हक्काचं 1BHK तरी घर असावं, हे प्रत्येकाचं स्वप्न (Home) असतं आणि प्रत्येकजण हे स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी रोजच्या रोज जीव तोडून मेहनत करत असतो. अनेकजण व्यवसाय किंवा ऑफिसमधून मिळालेल्या पगाराच्या पैशातून त्याची बचत करून त्यातून आपल्या हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण कसं करता येईल यासाठी प्रयत्नशील असतो. त्यामुळेच थोर मोठे नेहमी सांगतात की, घर घेण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन असणे आवश्यक असतं.

बिल्डर :

फक्त घरच नाही तर फ्लॅट, प्लॉट, गाडी किंवा इतर कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करणे सध्याच्या घडीला खूप महागडं झाले आहे. यासाठी आपल्या आयुष्यभराची कमाई किंवा बचत आपल्याला खर्च करावी लागते. परंतु हीच प्रॉपर्टी खरेदी करताना खूप सावधगिरी (Property Tips) बाळगणं गरजेचं असतं. अन्यथा तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. त्यामुळे आम्ही तुम्हाला आजच्या या लेखात घर खरेदी करतांना नेमकी काय काळजी घ्यावी? तसेच बिल्डर सोबत कशी बोलणी करावी हे सांगणार आहोत.

तुम्ही कोणत्याही भागात फ्लॅट खरेदी करायच्या वेळी बिल्डर किंवा रियल इस्टेट डेव्हलपर विषयी नीट माहिती मिळवणं आवश्यक आहे. तसेच त्यांच्याकडून कोणतीही प्रॉपर्टी (Property Tips) खरेदी करतेवेळी नेहमी प्रतिष्ठीत व नामांकित बिल्डरकडून घेण्याचा विचार करावा. घर घेण्याच्या आधी त्या बिल्डरचं ट्रॅक रेकॉर्ड नक्की चेक करून पाहावा.

प्रॉपर्टी लोकेशन : 

तुम्ही जेव्हा केव्हा जमीन किंवा घर खरेदी करण्याचा विचार करता, तेव्हा ती कोणत्या ठिकाणी आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण यामुळे तेथील ठिकाणाचा प्रॉपर्टीच्या भावावर मोठा परिणाम होतो. तसेच जर तुम्ही फक्त गुंतवणूकीच्या उद्देशानं प्रॉपर्टी (Property Tips) खरेदी करत असाल तर ती प्रॉपर्टीमध्ये अशाच ठिकाणी गुंतवणूक करा ज्यांचा सध्या विकास सुरु आहे. असे केल्यास तुम्हाला भविष्यात त्याचा चांगला मोबदला मिळू शकतो.

त्या जागेचे त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन असणे महत्त्वाचं (Property Tips) :

कोणतंही घर खरेदी करण्याआधी त्या बिल्डरचा रेरा अर्थात रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथोरिटीमध्ये नोंदणीकृत आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. जर तो रेरामध्ये रजिस्टर नसेल तर अशा बिल्डरकडून शक्यतो घर खरेदी करणं टाळा अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

Property Tips l पब्लिक ट्रान्सपोर्ट व सुविधा :

घर खरेदी करताना ज्या भागात ते घर आहे तिथून पब्लिक ट्रान्सपोर्ट म्हणजे रेल्वे स्टेशन, बस, ऑटो, महत्वाच्या गोष्टी घरापासून जवळ असणे आवश्यक आहे. तसचे सुविधांबाबत बोलायचे झाले तर तुमच्या प्रॉपर्टीच्या (Property Tips) भागापासून शाळा, हॉस्पिटल, शॉपिंग कॉम्लेक्स किती दूर आहेत याचा विचार करावा. तरच तुम्हाला भविष्यात चांगली किंमत मिळू शकते.

महत्वाच्या घडामोडी :

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा

Ather 450 Apex Vs OLA S1 Pro l देशात इलेक्ट्रिक स्कूटरला मागणी! या दोन स्कुटर एकमेकांशी करतील स्पर्धा