Sharad Mohol l शरद मोहोळ प्रकरणात पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Mohol l 5 जानेवारी 2024 रोजी पुण्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची हत्या झाली आहे. या हत्येच्या तपासाला अधिक वेग आला असल्याचे दिसून येत आहे. अशातच या धक्कादायक प्रकरणात एक महत्त्वपूर्ण माहिती हाती आली आहे.

दोन्हीही वकील दीड तास आरोपींसोबत असल्याची पोलिसांची माहिती! 

या खून प्रकरणात दोन वकिलांना अटक करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती देताना एक धक्कादायक खुलासा केला आहे अटक केलेले दोन्हीही वकील दीड तास आरोपींसोबत होते. हे दोन्ही वकील आरोपींना खेड शिवापुर टोल नाक्यावर जाऊन भेटले आहेत अशी माहिती कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी न्यायालयात दिली आहे.

या प्रकरणात अटक केलेले सर्व सहा आरोपी 15 डिसेंबर 2023 रोजी एकत्र भेटले होते. या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन देखील केला होता. तसेच 5 जानेवारी शरद मोहोळ यांचा खून केल्यानंतर साहिल पोळेकर आणि इतर आरोपी सातारा रस्त्याने पळून गेले असल्याचं समोर आलं आहे.

Sharad Mohol l शिवापूर टोलनाक्‍यावर भेट 

या सहा आरोपींना वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान खेड शिवापूर टोलनाक्‍यावर जाऊन भेटले. पवार आणि उडान यांनी आरोपींसोबत दीड तास प्रवास देखील केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपींसमवेत वकिलांना ताब्यात घेतले आहे.

तसेच यासंदर्भात अजून एक खुलासा झाला आहे. शरद मोहोळ (Sharad Mohol) खून प्रकरणातील सहा आरोपींना पोलिसांना शरण यायचे होते असा दावा ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान यांनी चौकशी दरम्यान केला होता. त्यावर पोलिसांनी आरोपींना शरण यायचे होते तर त्यांनी सिम कार्ड का बदलले ? पुण्याच्या दिशेने न येता विरुद्ध दिशेने का प्रवास केला ? दोन्ही वकील आरोपींना कुठे घेऊन जाणार होते? असे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पोलिसांच्या या प्रश्नाच्या उत्तरासाठी दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली आहे. यावेळी आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडी वाढवण्यास विरोध केला आहे. त्यानंतर वकिलांच्या पोलिस कोठडीत 11 जानेवारीपर्यंतची वाढ केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा