Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणात नवा अँगल; महत्त्वाची माहिती समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | कुख्यात गुंड शरद मोहोळच्या (Sharad Mohol) हत्येप्रकरणी पुणे पोलिसांनी आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी दोघे वकील असल्याचं समोर आलंय. अवघ्या 20 वर्षीय मुन्ना उर्फ साहील पोळेकर (Munna Alias Sahil Polekar ) याने शरद मोहोळ याची हत्या केली. शरद मोहोळ याचा खून मामाशी असलेल्या वादाचा बदला घेण्यासाठी करण्यात आला.

Sharad Mohol हत्येप्रकरणात नवा अँगल

वीस वर्ष वय असलेला साहिल पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे हे या खुनाचे सूत्रधार असल्याचं समोर आलंय. मात्र आता याप्रकरणी नवा अँगल समोर आला आहे. या हत्येमागं दुसरंच कारण असल्याचं कळतंय. शरद मोहोळ याच्या खुनामागे बडी धेंडे असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यामुळे पोलीस कोठडीत असलेल्या सर्व आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. एकमेकांसमोर बसवून आरोपींची चौकशी केली जात आहे.

खून केल्यानंतर आरोपींना एका गुंडाच्या नावाने घोषणा दिल्याचे सांगितलं जात आहे. आरोपींना तपास भरकटवायचा आहे का? किंवा दुसऱ्या एका गुंडांने शरद मोहोळ याला मारण्याची सुपारी दिलीये का?. याचा तपास केला जात आहे. या प्रकरणात मारणे टोळी आहे का? कारण संदीप मोहोळ याच्या हत्यनंतर शरद मोहळ याने मारणे टोळीशी बदला घेतला होता. यामुळे पोलीस या प्रकरणात मारणे टोळीचाही हात असू शकतो अशी शक्यता आहे.

पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावले होते. पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केलीये. कारण काही महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.

नेमकं प्रकरण काय?

पुण्यात भरदुपारी गुंड शरद मोहोळवर (Sharad Mohol) गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर जखमी झालेल्या शरद मोहोळला रूग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र या गोळीबारात शरद मोहोळचा मृत्यू झाला. पुण्यात भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती.

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी शरद मोहोळची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. मात्र आता शरद मोहोळ याच्या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी साहिल पोळेकर असल्याचं आता स्पष्ट झालंय.

महत्त्वाच्या बातम्या- 

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा