Sharad Mohol | पुण्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या करण्यात आली यानंतर संपूर्ण राज्यभरात एकच खळबळ उडाली. पुण्यातील कोथरूडसारख्या गजबजलेल्या परिसरात भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर कोथरुडसह अजूबाजूच्या परिसरात ताणवाचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान, शरदवर गोळ्या झाडणाऱ्या मुख्य आरोपीला पुणे पोलिसांनी अवघ्या 8 तासातच ताब्यात घेतलं. त्यानंतर शरद मोहोळच्या हत्येबाबत नवनवीन खुलासे समोर येऊ लागले. शरद मोहोळची हत्या त्याच्याच जवळच्या मित्राने केली.
काय आहे नेमका प्रकार?
कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. शरदची हत्या 5 जानेवारीला कोथरुड येथे सुतारदरा परिसरात त्याच्या ऑफिसजवळ झाली. शरदचा मारेकरी दुसरा तिसरा कोणी नसून त्याचा सख्खा मित्र मुन्ना उर्फ साहिल पोळेकर होता.
मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळचा सच्चा दोस्त होता. शरद मोहोळचा पाठीराखा बनून मोहोळच्याच पाठीत त्याने खंजीर खुपसला. मुन्नाचं वय 20 वर्ष आहे. मात्र, असं काय घडलं ज्यामुळे मुन्नाने शरदची हत्या केली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नेमकं काय घडलं?
शरद मोहोळ याचा मारेकरी मुन्ना पोळेकर या दोघांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले होते. मात्र, हा वाद फार जुना असल्याचं म्हटलं जात आहे. पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील एका जमीनीच्या वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात आहे.
व्यवहार ही अशी गोष्ट आहे, ज्यामुळे रक्ताचं नातं देखील फार काळ टीकत नाही. आणि याच व्यवहारामुळे मोहोळलाही संपवलं. तेही त्याच्याच साथीदारांनी तर मुन्नाच्या या गुन्ह्यात त्याचा मामाही सहभागी झाला होता. मुन्ना पोळेकर याचा मामा नामदेव कानगुडेंचा (Namdev Kangude) आणि शरद मोहोळ यांचा जुनावाद होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार मुन्नाने तीन महिन्यापूर्वीच पिस्तूल घेतली होती.
नामदेव कानगुडे आणि शरद मोहोळचे वाद-
नामदेव कानगुडे याच्यावर दोन गुन्हे दाखल आहेत. मोहोळचा काटा काढायचं ठरलं तेव्हा कानगुडेही यात सहभागी झाला. जुन्या वादामुळे नामदेवने मुन्नाला मध्यस्थी घेत शरद मोहोळचा गेम केला. मुन्ना आणि शरद मोहोळ यांचं घर दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे.
News Title : big update about sharad mohols murder
महत्त्वाच्या बातम्या-
Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणात नवा अँगल; महत्त्वाची माहिती समोर
Sharad Mohol l शरद मोहोळ प्रकरणात पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती!
Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान
Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई
Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’