Sharad Mohol च्या हत्येबाबत सर्वात मोठी माहिती समोर, ‘या’ दोन व्यक्तींनी दिली आरोपींना साथ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sharad Mohol |  कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्येनंतर दिवसेंदिवस नवनवीन खुलासे बाहेर येत आहे. शरद मोहोळ याची हत्या कोथरुड येथे त्याच्या ऑफिस जवळ झाली. शरदच्याच जवळच्या व्यक्तीने त्याची तीन गोळ्या झाडून भर दिवसा हत्या केली. पुण्यासारख्या गजबजलेल्या परिसरात असा प्रकार घडला त्यामुळे परिसरात सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र शरद मोहोळ याच्या हत्याबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

काय आहे प्रकरण?

शरद मोहोळ (Sharad Mohol) याला मारण्यासाठी त्याच्या जवळच्या व्यक्तीनेच कट रचला होता. शिवाय मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर यांनीच शरदवर मागून गोळ्या झाडल्या. दरम्यान, शरदला मारण्यासाठी कट रचत असताना 15 डिसेंबरलाच सर्व आरोपी भेटले होते.

शरदला मारणाऱ्या 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यामध्ये रवींद्र वसंत पवार व संजय रामभाऊ उढाण या दोन वकिलांचा देखील समावेश होता. या दोन वकिलांचा या हत्याकांडात हात होता का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दोन वकिलांचा समावेश?

शरदला (Sharad Mohol) मारण्यासाठी मुख्य आरोपींसबोत दोन वकीलांचा देखील समावेश होता. शरद मोहोळ याला गोळ्या घातल्यानंतर आरोपींनी वकिलांना फोन करुन याची माहिती दिली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून रिक्षातून कात्रज परिसरात दाखल झाले होते.

पुढे काय घडलं?

दरम्यान, त्यानंतर दोन्ही वकील आरोपींना भेटण्यासाठी खेड शिवापूर टोलनाका परिसरात गेले होते. कारमधील एक वकील गाडीत उतरून आरोपींच्या गाडीत बसला. तर दुसऱ्या वकिलाच्या गाडीत तीन आरोपी जाऊन बसले. यानंतर तब्बल 15 ते 16 किलोमीटर आरोपी आणि वकिलांनी प्रवास केल्यानंतर दोन ठिकाणी ते चर्चा करण्यास थांबल्याचं पोलीस तपासात निष्पण्ण झालं होतं.

पोलिसांनी मुळशीतील एका कुख्यात गुन्हेगाराला चौकशीसाठी बोलावलं होतं. पोलिस आयुक्तालयात सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांनी त्याची चौकशी केलीये. कारण काही महिन्यापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता.

News Title : big blast about sharad mohols murder

महत्त्वाच्या बातम्या-

Compact Powder वापर असाल तर ही बातमी नक्की वाचा!

‘…म्हणून मी आडनाव बदलून टाकलं ‘; Pankaj Tripathi यांचा मोठा खुलासा!

Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे’; बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप

Entertainment News | बाॅलिवूडवर शोककळा, ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास

Ranveer Singh ला ‘ती’ पोस्ट पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल