Entertainment News | बाॅलिवूडमध्ये अनेक दिग्गज संगितकारांनी आपल्या नावाचा ठसा उमटवला आहे. त्यातच प्रसिद्ध संगितकार उस्ताद राशिद खान यांचा देखील समावेश आहे. राशिद खान यांनी बाॅलिवूडमध्ये काही चित्रपटासाठी गाणे गायले आहेत. दरम्यान आज राशिद खान यांनी अखेरचा श्वास घेतल्यामुळे बाॅलिवूडवर दुखःचा डोंगर कोसळला आहे. राशिद खान काही काळापासून प्रोस्टेट कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र, त्यांची ही झुंज आपयशी ठरली.
नेमकं काय घडलं?
राशिद खान यांनी बाॅलिवूडमध्ये (Entertainment News) फार कमी गाणे गायले आहेत. मात्र राशिद खान यांनी गायलेलं जब वी मेटमधलं गाणं आओगे जब तुम हो साजना, माय नेम इज खान या चित्रपटातील गाण्यांनी त्यांनी त्यांच्या आवाजाने लोकांना भुरळ घातली होती.
राशिद खान यांच्यावर कोलकाता येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. वयाच्या 55 व्या वर्षीय राशिद खान यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्यात सेरेब्रल अटॅक आल्याने त्यांची तब्येत ढासळली होती. रामपूर-सहस्वान घराण्यातील 55 वर्षीय तरुणावर सुरुवातीला टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.
2022 मध्ये राशिद खान यांना पद्मभूषण पुरस्काराने (Entertainment News) गौरवण्यात आलं होतं. त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील शोक व्यक्त केला आहे. त्यांचं पार्थिव कोलकात्यातील पियरलेस रुग्णालयात 6 वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर आज रात्रभर कोलकातातील पीस हेवन रुग्णालयात त्यांचं पार्थिव ठेवण्यात येणार आहे.
“राशिद खान यांना अटॅक आला होता”
News Title : entertainment news bollywood singer passed away
महत्त्वाच्या बातम्या-
Ranveer Singh ला ‘ती’ पोस्ट पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल
Mla Disqualification | ‘हे तर धक्कादायक आहे’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य
Cough Syrup | मुलांना कफ सिरप देत असाल तर आताच व्हा सावध; धक्कादायक प्रकार समोर
Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा
दोस्त दोस्त ना रहा…, Sharad Mohol च्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!