Mla Disqualification | ‘हे तर धक्कादायक आहे’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | शिवसेनेतील आमदार आपत्रतेबाबत (Mla Disqualification) कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. यानंतर आता ही सुनावणी संपली असून 16 आमदारांच्या अपात्रतेचा (Mla Disqualification) निकाल 10 जानेवारी 2024 रोजी दिला जाणार आहे.

घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

शिवसेना आमदार अपात्रतेच्या निकाल जाहीर होण्यास आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष आहे. याआधी सुनावणीतील कायदेशीर बाबींवर घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी मोठं वक्तव्य केलंय.

रिजनेबल टाईम म्हणजे 3 महिने, पण आता 8 महिने झाले तरी सुद्धा निकाल दिलेला नाही. या विधानसभा अध्यक्षांवर दबाव आहे किंवा हे अध्यक्ष अकार्यक्षम आहेत. काल विधानसभा अध्यक्ष यांनी मुख्यमंत्री यांची भेट घेतली हे तर धक्कादायक आहे आणि घटनेच्या कुठल्याच नैतिकतेत बसत नाही. उद्या काय निर्णय देतील काही सांगू शकत नाहीत, असं उल्हास बापट यांनी म्हटलं आहे.

Mla Disqualification | “हे कुठल्या अधिकाराने माध्यमांशी बोलत आहेत?”

राहुल नार्वेकर हे विधानसभा अध्यक्ष आहेत. त्यांच्यासमोर आमदार अपात्रता प्रकरणाची चौकशी सुरु आहे. अशावेळी यांनी मीडिया यासमोर बोलायचं नाही हा पहिला नियम आहे. हे कुठल्या अधिकाराने माध्यमांशी बोलत आहेत?, असा सवाल उल्हास बापट यांनी केला आहे.

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल तयार असून विधानसभा अध्यक्षांनी ही निकालाचा मसुदा दिल्लीला कायदेशीर अभिप्रायासाठी तज्ज्ञांकडे पाठवल्याची माहिती देखील समोर आली आहे.

दरम्यान, निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर उद्धव ठाकरे यांचं मोठं नुकसान होणार आहे. पण ठाकरेंच्या बाजून निकाल लागला तर या निकालामुळे एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाऊ शकतं. त्यामुळे येत्या 10 जानेवारीला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर राहणार की जाणार? हे कळेल.

महत्त्वाच्या बातम्या- 

Cough Syrup | मुलांना कफ सिरप देत असाल तर आताच व्हा सावध; धक्कादायक प्रकार समोर

Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा

दोस्त दोस्त ना रहा…, Sharad Mohol च्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणात नवा अँगल; महत्त्वाची माहिती समोर

Sharad Mohol l शरद मोहोळ प्रकरणात पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती!