Ranveer Singh ला ‘ती’ पोस्ट पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ranveer Singh | पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपला भेट दिली होती. या दौऱ्याचे फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले होते. मात्र यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील काही नेत्यांनी यावर वादग्रस्त प्रतिक्रिया दिल्याने लक्षद्वीप आणि मालदीव प्रकरणी नवा वाद निर्माण झाला आहे. यावर देशभरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. यावरच अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) यानेही पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.

रणवीर सिंहने पोस्टमध्ये लक्षद्वीप नाही तर, मालदीवचे फोटो पोस्ट केल्याने त्याला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल केले जात आहे. यामुळेच त्याला नंतर आपली पोस्ट डिलीटही करावी लागली.

Ranveer Singh ची पोस्ट

रणवीर सिंगने पोस्ट करत आपल्या चाहत्यांना मालदीव ऐवजी लक्षद्वीपला भेट देऊन भारतीय संस्कृतीचा अनुभव घेण्याचे आवाहन केले होते. आपल्या भारत देशामध्ये पर्यटनासाठी बरीच ठिकाणे आहेत. त्यात निसर्गरम्य आणि बिच असणारे ठिकाणेही आहेत. त्यामुळे देशातील या सुंदर ठिकाणाचा आनंद घ्यायला हवा, असे म्हणत रणवीरने (Ranveer Singh) काही फोटोही पोस्ट केले होते.

या पोस्टनंतर चाहत्यांकडून लगेच प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली. कारण, रणवीरने लक्षद्वीप समजून मालदीवचे फोटो पोस्ट केले होते. या पोस्टनंतर त्याला सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. ‘लक्षद्वीपचे प्रमोशन करण्याच्या नादामध्ये मालदीवचा फोटो पोस्ट केला’, ‘मालदीवचा फोटो पोस्ट करत मालदीवचा बहिष्कार’, अशा कमेंट्स चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर केल्या. यानंतर चूक लक्षात येताच त्याने आपली पोस्ट डिलीट केली.

लक्षद्वीप-मालदीव प्रकरण नेमकं काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौऱ्याची फोटो पोस्ट केल्यानंतर मालदीव (Lakshadweep-Maldives dispute) मधील मंत्र्यांनी टीका करण्यास सुरुवात केली. मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार असल्याचं तेथील मंत्री झाहिद रमीझ यांनी म्हटलंय. यावरच न थांबता त्यांनी “आम्ही जशी सेवा पुरवितो, तशी सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाळू शकतात का? हॉटेलच्या खोल्यामध्ये प्रचंड घाण वास येतो, त्याचे काय करणार?’,असा सवाल करत मोदींवर टीका केली. आणि येथूनच या वादाची सुरुवात झाली. यावरच रणवीर सिंहने (Ranveer Singh) पोस्ट केली होती.

या प्रकरणी अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्यासह अनेक दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. सोशल मिडियावर यानंतर अनेकांनी बायकॉट मालदीव ही सोशल मोहीमही सुरू केली. तर, अनेक दिग्गजांनी लक्षद्वीप पर्यटनाचे प्रमोशनही केले.

News Title- Ranveer Singh troll in social media

महत्त्वाच्या बातम्या- 

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा