Cough Syrup | मुलांना कफ सिरप देत असाल तर आताच व्हा सावध; धक्कादायक प्रकार समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Cough Syrup | काही महिन्यांपूर्वीच भारतात काही कफ सिरपची मान्यता रद्द करण्यात आली. बऱ्याचदा लहान मुलांना सर्दी-खोकला झाला की पालतकसलाच विचार न करता लगेच बालकांना कफ सिरप पाजतात. मात्र, हेच कफ सिरप बालकाच्या जीवावर बेतू शकतं. याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. एका रुग्णालयात कफ सिरपमध्ये चक्क अळ्या आढळून आल्याने खळबळ माजली आहे.

राज्यातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील खापर प्राथमिक आरोग्य केंद्रात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या केंद्रात खोकल्याच्या उपचारासाठी एका लहान बालकाला कफ सिरप (Cough Syrup) देण्यात आले होते. मात्र, या सिरपमध्ये अळ्या आढळून आल्याने बालकाच्या आई-वडिलांनी त्वरित ठाकरे गटाचे आमदार पाडवी (MLA Padvi) यांच्याकडे धाव घेत याबाबतचा खुलासा केला.

Cough Syrup मध्ये आढळल्या अळ्या

आमदार पाडवी यांनी घटनेची संपूर्ण माहिती घेत तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र गाठून घटनेची चौकशी केली. यादरम्यान, त्यांना हे (Cough Syrup) औषध लहान मुलांना दिलं जात असल्याचं आढळून आलं. या प्रकारानंतर त्यांनी सरकार आदिवासी बालकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला.

पदवी यांनी लगेच घटनेबाबत आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार केली. घटनेची माहिती मिळताच आरोग्य उपसंचालक तपासणीसाठी तेथे हजर झाले. या सर्व प्रकारातून प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांच्या आरोग्यासोबत खेळ खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी आता चौकशी करण्याची मागणी पडावी यांनी केली आहे.

Cough Syrup देताना काळजी घ्यावी

नंदुरबार जिल्हा हा आदिवासी भाग असल्याने याकडे सरकार अधिक लक्ष देत नसल्याचा आरोपही पाडवी यांनी केला आहे. सरकारने घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली नाही तर रस्त्यावर उतरण्याच्या इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या सर्व घटनेतून बालकांना कफ सिरप (Cough Syrup) देताना आई-वडिलांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा बालकाचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. या घटनेवर आता सरकार काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title- Cough Syrup Caution

महत्त्वाच्या बातम्या- 

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान

Uddhav Thackeray | निकालाच्या एक दिवसापूर्वी ठाकरे गटाला मोठा झटका; ईडीची मोठी कारवाई

Rain Alert l राज्यात अवकाळी पावसाचे संकट कायम! ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Gautam Adani l अखेर डील पक्की…गौतम अदानींनी खरेदी केली ही मोठी कंपनी

Indian Railway Ticket Booking l आता घरबसल्या काढता येणार रेल्वे तिकीट; या स्टेप्स फॉलो करा

News Title- Cough Syrup Caution