Raj Thackeray | ‘राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे’; बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्मान सेना अर्थात मनसे या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पक्षावर मनसेच्या पदाधिकाऱ्यानेच गंभीर आरोप केल्याचं समोर आलं आहे. राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे. तर माथाडी कामगार प्रकरणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा पुत्र अमित ठाकरे यांनी मारहाण केल्याचेही त्याच पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे.

“राज ठाकरेंचा पक्ष खंडणीखोर आहे”

कामगारांची बाजू सोडत नाही म्हणून मनसे नेते अमित ठाकरे यांनीच आपल्याला राजगड येथे बोलवून बेदम मारहाण केल्याचा दावा मनसेच्या मराठी कामगार सेनेचा अध्यक्ष महेश जाधव यांनी केलाय. महेश जाधव यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप ठाकरेंवर केला आहे.

मी महेश जाधव. मी आता राजगडमध्ये कामागरांची बाजू घेतली म्हणून अमित ठाकरेंनी माझ्यावर हात उचलला. हे ठाकरे आहेत की गुंड आहेत? अमित ठाकरेंसारख्या माणसाला हे शोभत नाही. अमित ठाकरे यांनी माझ्यावर हात उचलला. त्यांना 800 हजार कामगारांचा तयतयाट लागेल, असं महेश जाधव सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओत म्हणाले आहेत.

बड्या पदाधिकाऱ्याचा अमित ठाकरेंवर गंभीर आरोप

मनसेकडून याबाबत अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन पत्रक जारी करण्यात आलं आहे. या पत्रकात मराठी कामगार सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

सर्व महाराष्ट्र सैनिकांना कळविण्यात येत आहे की, राज ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठी कामगार सेना या संघटनेची आणि त्या संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे, असं पत्रात मनसेने पत्रात म्हटलंय.

मराठी कामगार सेना या संघटनेचा, त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा आजपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अथवा पक्षाची अंगीकृत संघटना महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेशी कोणताही संबंध नसेल. त्यामुळे मराठी कामगार सेनेच्या कोणत्याही भूमिकांशी, मराठी कामगार सेनेच्या पदाधिकारी-सदस्यांशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या राजकीय पक्षाचा, पक्षाच्या इतर अंगीकृत संघटनांचा कोणताही संबंध नसेल याची सर्व महाराष्ट्र सैनिकांनी नोंद घ्यावी, असंही पत्रात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Entertainment News | बाॅलिवूडवर शोककळा, ‘या’ प्रसिद्ध गायकाने घेतला अखेरचा श्वास

Ranveer Singh ला ‘ती’ पोस्ट पडली महागात; सोशल मीडियावर होतोय ट्रोल

Mla Disqualification | ‘हे तर धक्कादायक आहे’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

Cough Syrup | मुलांना कफ सिरप देत असाल तर आताच व्हा सावध; धक्कादायक प्रकार समोर

Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा