‘…म्हणून मी आडनाव बदलून टाकलं ‘; Pankaj Tripathi यांचा मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pankaj Tripathi | मिर्झापूर, फुकरे, मिमी, स्त्री, लुडो अशा चित्रपटात आपल्या भूमिकेने वेगळी छाप निर्माण करणारे अभिनेते पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi ) लवकरच ‘में अटल हू’ या चित्रपटाध्ये दिसून येणार आहेत. भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित या बयोपिकमध्ये पंकज त्रिपाठी मुख्य भूमिकेत असणार आहेत. या अभिनेत्याबद्दल एक गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नाही. पंकज त्रिपाठी यांचे मूळ नाव हे त्रिपाठी नाही तर तिवारी आहे. नुकताच त्यांनी एका मुलाखती दरम्यान हा खुलासा केला.

Pankaj Tripathi यांचा खुलासा

‘इतिहासात कदाचित असं पहिल्यांदाच घडलं असेल कि, वडिलांना आपल्या मुलामुळे नाव मिळालं असेल. मी दहावीचा प्रवेश अर्ज भरत होतो. माझ्या काकांचं आडनाव त्रिपाठी होतं आणि ते सरकारमध्ये अधिकारी झाले होते. एक बाबा देखील होता त्यांचेही आडनाव त्रिपाठी होते नंतर ते ते हिंदीचे प्राध्यापक झाले. पण माझे आडनाव तिवारी असलेले एकतर पुजारी किंवा शेतकरी होते’, असे पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi ) यांनी सांगितलं.

पुढे ते म्हणाले कि, मला शेतकरी किंवा पुजारी बनायचे नव्हते. त्यामुळे मी फॉर्ममध्ये माझं नाव ‘त्रिपाठी’ टाकून दिलं. त्यानंतर मी माझ्या वडिलांचेही नाव तिवारी बदलून ‘त्रिपाठी’ ठेवले. त्यामुळे माझं आडनाव हे तिवारी ऐवजी त्रिपाठी पडून गेले. असा खुलासा पंकज त्रिपाठी यांनी एका मुलाखती दरम्यान केला.

यासोबतच त्यांनी आपल्या बालपणीचा एक किस्साही सांगितला. “मी सायकल वर स्टंट करून मुलींमध्ये माझी छाप सोडायचो. मी शाळेत सातवी किंवा आठवीत असतानाची ही गोष्ट आहे. तेव्हा सायकल रेस स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यावेळी एक मुलगा या शर्यतीत विजयी झाला आणि तो मुलींमध्ये खूप प्रसिद्ध झाला.त्यामुळे मलाही असं वाटलं की, मी पण या शर्यतीत विजयी होऊन मुलींमध्ये फेमस होणार. मात्र, मी त्यात हरलो होतो.”, हा मनोरंजक किस्सा त्रिपाठी यांनी सांगितला.

पुढे त्यांनी अजून एक किस्सा सांगत आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मला पोहणं शिकण्याची खूपच हौस होती. माझ्या घराच्या मागे एक नदीदेखील होती. या नदीवर तेव्हा छोटे काळे किडे असायचे. त्यावेळी काही मुलांनी मला हे किडे खाल्ले की, तुला पोहता येईल असे सांगितले. त्याचं ऐकून मी तेव्हा चक्क 10-12 किडे खाऊनही टाकले. त्यावेळी माझं पोट खराब झालं नाही याचं मला समाधान वाटतं, असं पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi ) यांनी सांगितलं.

‘मैं अटल हूं’मध्ये झळकणार Pankaj Tripathi

दरम्यान, पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi ) यांची मुख्य भूमिका असलेला दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा ‘मैं अटल हूं’ हा बायोपिक यावर्षी १९ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. त्रिपाठी यांच्या 2023 मध्ये ओएमजी 2 , फुकरे 3 या सुपरहिट चित्रपटांसोबतच ‘कडक सिंह’ या वेबसिरीजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.  आता चाहते त्यांच्या ‘मैं अटल हूं’  या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

News Title- Pankaj Tripathi biggest revelation

महत्वाच्या बातम्या- 

Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा

दोस्त दोस्त ना रहा…, Sharad Mohol च्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणात नवा अँगल; महत्त्वाची माहिती समोर

Sharad Mohol l शरद मोहोळ प्रकरणात पोलिसांच्या हाती लागली मोठी माहिती!

Property Tips l घर खरेदी करताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, अन्यथा तुमचे होईल मोठे नुकसान