Compact Powder वापर असाल तर ही बातमी नक्की वाचा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Compact Powder | प्रत्येक मुलींना सौदर्य प्रसाधनांची आवड असेलच असं नाही. पण बऱ्यापैकी मुली कुठे बाहेर जायचं असेल, किंवा स्पेशल ओकेजनला जायचं असलं की कॉम्पॅक्ट पावडरचा वापर करतात. कॉम्पॅक्ट पावडरमुळे चेहरा गोरा आणि उठून दिसतो खरा. पण याचा रोज वापर करणं चेहऱ्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतं. यामुळे त्वचेशी सबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात.

तज्ञांच्या मतानुसार कॉम्पॅक्ट पावडर (Compact Powder ) हे कोस्मेटीक प्रोडक्ट त्वचेसाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं. कारण, हे पावडर अत्यंत बारीक कणांचं बनवलेलं असतं. ही भूट्टी त्वचेच्या छिद्रांमध्ये थेट शिरून या छिद्रांना बंद करून टाकते. यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होऊन त्वचेच्या निरोगी पेशी नष्ट होऊ लागतात.

Compact Powder चा अतिवापर ठरू शकतो घातक

या पावडरचा रोज वापर केल्याने त्वचा वृद्ध होऊ लागते. तसेच सुरकुत्या पडणे, ड्राय पडणे, खाज येणे या समस्या उद्भवू लागतात. काही टॅल्कम पावडरमध्ये (Compact Powder ) एस्बेस्टोस आणि स्पास्टिसरखे घातक पदार्थ देखील वापरले जातात. यामुळे फुफ्फुसाच्या कर्करोगासारखा आजार होण्याचीही शक्यता असते.

त्यामुळे कॉम्पॅक्ट किंवा टॅल्कम पावडर खरेदी करताना त्यात एस्बेस्टोससारखे हानिकारक घटक आहेत का, याची माहिती करूनच ती खरेदी करायला हवी. त्यामुळे भविष्यात समस्या उद्भवत नाही. काही जणांची त्वचा ही खूप सेन्सिटिव्ह असते त्यामुळे कॉम्पॅक्टचा वापर केला की, लगेच त्यांना खाज येणे, त्वचा लाल होणे अशा समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कॉम्पॅक्ट खरेदी करताना खबरदारी पाळायला हवी.

अशी राखा चेहऱ्याची निगा

यासोबतच कॉम्पॅक्ट पावडरची (Compact Powder ) एक्सपायरी डेट नीट पारखून घ्यायला हवी. कारण एक्सपायरी झालेले प्रोडक्ट तर त्वचेसाठी अजूनच घातक आहेत. यामुळे त्वचेचा कॅन्सर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे काहीही खरेदी करताना त्याची एक्सपायरी डेट अगोदर तपासून घ्यायला हवी.

तसेच, आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार योग्य असलेली कॉम्पॅक्ट पावडर निवडायला हवीत. आपण ज्या योग्यप्रकारे कॉम्पॅक्ट लावतो तसाच तो योग्यपणे काढायलाही हवा. मेकअप करून झोपल्याने त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे संपूर्ण चेहऱ्याचा मेकअप काढूनच झोपायला हवे. संपूर्ण चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन पावडर काढून टाकायला हवे. या छोट्या छोट्या उपायांनी चेहऱ्याची निगा राखता येते.

News Title-  Compact Powder Side Effects

महत्त्वाच्या बातम्या- 

Mla Disqualification | ‘हे तर धक्कादायक आहे’; घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं वक्तव्य

Cough Syrup | मुलांना कफ सिरप देत असाल तर आताच व्हा सावध; धक्कादायक प्रकार समोर

Bigg Boss 17 | सलमान खान आणि तब्बू लग्न करणार?; बिग बॉसच्या मंचावर केला खुलासा

दोस्त दोस्त ना रहा…, Sharad Mohol च्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर!

Sharad Mohol | शरद मोहोळ हत्येप्रकरणात नवा अँगल; महत्त्वाची माहिती समोर