Mohammed shami | “PM मोदी आपल्या देशाला…”, मालदीव वादावर शमीचं मोठं विधान

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mohammed shami | पर्यटनावरून भारत आणि मालदीव यांच्यात वाद सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीयांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मालदीव सरकारने आपल्या तीन मंत्र्यांची हकालपट्टी केली. भारतीयांचा अपमान होताच विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळींनी याविरोधात आवाज उठवला. अनेकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन करत भारतीय पर्यटनाला पाठिंबा देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. अशातच भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने (Mohammed Shami’s Big Remark On Tourism) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक मोठे विधान केले आहे.

शमीने मालदीवमधील सध्या सुरू असलेल्या वादावर बोलताना भारतीय पर्यटनाला पाठिंबा दर्शवला आणि नागरिकांना भारतीय समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य जाणून घेण्याचा सल्ला दिला. मालदीवचे मंत्री, नेते आणि इतर सार्वजनिक व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीनंतर मोहम्मद शमीने हे विधान केले.

खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपला भेट दिली. या दौऱ्याची काही छायाचित्रे शेअर करून त्यांनी लोकांना लक्षद्वीप पाहण्यास सांगितले होते. एकूणच भारतीय पर्यटन क्षेत्राला वाव मिळावी यादृष्टीने मोदींनी हे पाऊल टाकले. मात्र, मालदीवमधील काही मंत्र्यांना हे खटकले आणि त्यांनी मोदींच्या फोटोवर अपमानजनक प्रतिक्रिया दिली, ज्यावरून वाद चिघळला.

Mohammed shami कडून मोदींचे कौतुक

वृतसंस्था एएनआयशी बोलताना शमीने विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला. तो म्हणाला, “आपण आपल्या पर्यटनाला चालना दिली पाहिजे. देश कोणत्याही पद्धतीने प्रगती करत असला तरी ते सर्वांसाठी चांगले आहे. पंतप्रधान आपल्या देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आपणही त्यांना या माध्यमातून पाठिंबा द्यायला हवा.”

तसेच मोहम्मद शमीच्या आधी अनेक क्रिकेटपटूंसह बॉलिवूड कलाकारांनी मालदीवमधील सार्वजनिक व्यक्तींनी भारताविरुद्ध केलेल्या ‘वर्णद्वेषी’ टिप्पण्यांवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या आणि नागरिकांना पर्यटनासाठी भारतीय समुद्रकिनाऱ्यांकडे वळण्यास सांगितले होते. मालदीवमधील तत्कालीन मंत्र्यांच्या विधानांमुळे ‘आत्मनिर्भर भारत’चा सूर सर्वत्र पसरला आहे.

शमी दुखापतग्रस्त

दक्षिण आफ्रिकेतील केपटाउनमध्ये ऐतिहासिक विजयाची नोंद केल्यानंतर भारतीय संघाची नजर आता इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेकडे आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका होणार असून या मालिकेतील पहिला सामना 25 जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. मात्र, मोहम्मद शमी दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आगामी मालिकेत तो खेळतो का हे पाहण्याजोगे असेल.

Ram Mandir Inauguration | उत्तर प्रदेश सरकारची विशेष तयारी; CM योगींची मोठी घोषणा

Animal Movie | महिलांवरील अत्याचार दाखवणारेच चित्रपट लोकांना आवडतात; कंगनाचा संताप

Team India ला पुन्हा अपयश! ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम; पाहुण्यांचा गोड शेवट

Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान; ‘लेका’चा गौरव अन् आईचे डोळे पाणावले

Jackie Shroff | राम मंदिर उद्धाटनावर जॅकी श्रॉफ यांची पोस्ट, म्हणाले…