Ram Mandir Inauguration | उत्तर प्रदेश सरकारची विशेष तयारी; CM योगींची मोठी घोषणा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ram Mandir Inauguration | अयोध्येत 22 तारखेला होणाऱ्या भव्य कार्यक्रमाचा उत्साह देशभरात आहे. अशातच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील कार्यक्रमानिमित्त खास नियमावली आखली आहे. अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणार्‍या अभिषेक सोहळ्याला ‘राष्ट्रीय सण’ असे संबोधून योगींनी त्या दिवशी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. उत्तर प्रदेश सरकारच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अभिषेक सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आणि आवश्यक मार्गदर्शक सूचना दिल्या.

अयोध्येतील रामललाच्या नवीन मूर्तीच्या बहुप्रतिक्षित अभिषेक सोहळ्याच्या दिवशी 22 जानेवारीला राज्यातील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. तसेच या भव्य कार्यक्रमाच्या दिवसाला ‘राष्ट्रीय सण’ म्हणून संबोधत योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारीला राज्यातील दारूची दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Ram Mandir Inauguration अन् यूपी सरकारची खास तयारी

दरम्यान, शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यापूर्वी योगींनी श्री रामलला आणि हनुमान गढीचे दर्शन घेऊन पूजन केले. यानंतर मुख्यमंत्र्यांनी श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांची देखील बैठक घेतली. मकर संक्रातीनंतर सुरू होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या वैदिक विधींची माहिती घेत आदित्यनाथ यांनी तीर्थ क्षेत्र ट्रस्टला समारंभाच्या सुरक्षा आणि इतर व्यवस्थेमध्ये आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले, “अयोध्येत अभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना चांगला आदरातिथ्य मिळायला हवा. प्रत्येक व्हीआयपी अतिथीच्या विश्रांतीची जागा आधीच निवडली पाहिजे. वातावरण पाहता काही जण एक-दोन दिवस आधी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या राहण्याची उत्तम व्यवस्था असावी.”

अयोध्येत हॉटेल्स आणि धर्मशाळा आहेत. होम स्टेची व्यवस्थाही उपलब्ध आहे. टेंट सिटींची संख्या वाढवण्याची गरज आहे. कुंभाच्या धर्तीवर अयोध्येत 25-50 एकरांवर भव्य तंबूनगरी उभारली जावी, असेही योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.

वेगवेगळ्या भाषांमध्ये दिशादर्शक लावले जाणार

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 22 जानेवारीनंतर संपूर्ण जगभरातील राम भक्त अयोध्येत दाखल होतील आणि त्यांच्या सोयीसाठी संपूर्ण शहरात विविध भाषांमधील फलक लावण्यात यावेत. ही मार्गदर्शक तत्त्वे संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषांमध्ये आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहा भाषांमध्ये असावीत.

Animal Movie | महिलांवरील अत्याचार दाखवणारेच चित्रपट लोकांना आवडतात; कंगनाचा संताप

Team India ला पुन्हा अपयश! ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम; पाहुण्यांचा गोड शेवट

Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान; ‘लेका’चा गौरव अन् आईचे डोळे पाणावले

Jackie Shroff | राम मंदिर उद्धाटनावर जॅकी श्रॉफ यांची पोस्ट, म्हणाले…

Sharad Mohol च्या हत्येबाबत सर्वात मोठी माहिती समोर, ‘या’ दोन व्यक्तींनी दिली आरोपींना साथ