Animal Movie | महिलांवरील अत्याचार दाखवणारेच चित्रपट लोकांना आवडतात; कंगनाचा संताप

Animal Movie | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. तिला तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखले जाते. कंगना सतत कोणत्याही मुद्द्यावर जाहीरपणे आपली भूमिका मांडत असते. मग तो विषय राजकीय लोकांचा असो की मग बॉलिवूडमधील कलाकारांचा… कंगना रनौत प्रत्येक मुद्द्यावर आपले मत मांडण्यासाठी प्रसिद्ध आहे. सोशल मीडियावरील प्रत्येक सामाजिक विषयावर आणि ट्रेंडिंग समस्येवर ती अनेकदा आपले मत व्यक्त करते. चित्रपटांसोबतच डॅशिंग गर्ल कंगना तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही लोकांमध्ये लोकप्रिय आहे. आता तिने ॲनिमल चित्रपटावरून संताप व्यक्त केला आहे.

कंगनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून रणबीर कपूरचे नाव न घेता त्याच्या ॲनिमल चित्रपटावर आक्षेप घेतला. कंगनाने लिहिले की, महिलांवर अत्याचार करणारे चित्रपट प्रेक्षकांना का आवडतात. करण जोहर आणि त्याच्या टोळीला तिचे करिअर संपवायचे आहे. तसेच अ‍ॅनिमलचे यश अत्यंत धोकादायक आहे.

 

Animal Movie बॉक्स ऑफिसवर सुसाट

आपल्या एका महिला चाहत्याच्या पोस्टला उत्तर देताना अभिनेत्रीने ही प्रतिक्रिया दिली. खरं तर संबंधित महिला चाहत्याने कंगनाच्या तेजस या चित्रपटाचे कौतुक करत तो पाहण्याचे आवाहन केले होते. अ‍ॅनिमल चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घालण्यात यश मिळवले. बॉक्स ऑफिसवर 800 हून अधिक कोटींचा गल्ला कमावणाऱ्या या चित्रपटात अशी काही दृश्ये होती जी अनेकांना खटकली.

त्याचाच दाखला देत कंगनाने म्हटले, “माझे चित्रपट फ्लॉप व्हावेत यासाठी पैसे देऊन नकारात्मकता पसरवली जाते. मी खूप मेहनत करतेय पण प्रेक्षकांना असे चित्रपटही आवडतात ज्यात महिलांना मारहाण केली जाते. त्यांना शूज चाटण्यास सांगितले जाते. महिला सक्षमीकरणावर चित्रपट बनवणाऱ्या व्यक्तीसाठी असे चित्रपट धक्कादायक आहेत. आता मला माझ्या आयुष्यातील येणारी वर्षे काही चांगल्या गोष्टींमध्ये घालवायची आहेत.”

 

Animal ला चांगले यश

रणबीर कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंदान्ना आणि तृप्ती डिमरी यांच्या ॲनिमल या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले. या चित्रपटाने जगभरात 898 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. यासह हा चित्रपट 2023 च्या ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे.

दुसरीकडे, अनेकांनी ॲनिमल चित्रपटाच्या मुद्द्यावरून वाद घातला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात होता आणि या चित्रपटाला महिला विरोधी म्हटले गेले होते. अभिनेत्री कंगना रनौतने देखील या मुद्द्यावरून आक्षेप घेतल्याचे दिसले. ॲनिमलमध्ये महिलेलवर अत्याचार केले जातात आणि हेच लोकांना आवडत असल्याची खंत तिने व्यक्त केली.

Team India ला पुन्हा अपयश! ऑस्ट्रेलियाचा विजयरथ कायम; पाहुण्यांचा गोड शेवट

Mohammed Shami चा अर्जुन पुरस्कारानं सन्मान; ‘लेका’चा गौरव अन् आईचे डोळे पाणावले

Jackie Shroff | राम मंदिर उद्धाटनावर जॅकी श्रॉफ यांची पोस्ट, म्हणाले…

Sharad Mohol च्या हत्येबाबत सर्वात मोठी माहिती समोर, ‘या’ दोन व्यक्तींनी दिली आरोपींना साथ

Compact Powder वापर असाल तर ही बातमी नक्की वाचा!