Play Store App Download Alert l सावधान! Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करताय…? मग त्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Play Store App Download Alert l आजच्या काळात सर्वांसाठी स्मार्टफोन अत्यंत गरजेची व महत्त्वाची वस्तू बनली आहे. त्यातच आताच्या घडीला स्मार्टफोनच्या युजर्सची संख्या भारत झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दुसरीकडे स्मार्टफोनवरील डेटा चोरीसह फसवणुकीचे प्रकार वाढताना दिसत आहेत.

बँकिंग तपशीलासारखा महत्त्वाचा डेटा चोरतात : 

हॅकर्स युजर्सना माहिती न देता गुगल प्ले स्टोर किंवा ॲप स्टोरमधील लिंक्स किंवा ॲप्सद्वारे (Play Store App Download Alert) आयफोन किंवा अँन्ड्रॉईड फोनमध्ये धोकादायक मालवेअर टाकून त्यांना टारगेट करतात.

स्मार्टफोन मध्ये सापडणारे हे व्हायरस ऑपरेटिंग सिस्टीमच्या असुरक्षित भागांवर हल्ला करतात आणि बँकिंग तपशीलासारखा महत्त्वाचा डेटा चोरतात. हे मालवेअर कोणत्याही आयफोन किंवा अँन्ड्रॉईड फोनला प्रभावित करू शकतात. त्यामुळे अँप्स डाउनलोड करतांना काय काळजी घ्यावी हे लक्षात करून घ्या….

ॲप डाउनलोड करताना काय काळजी घ्यावी (Play Store App Download Alert) :

1. स्पीड क्लीन, सुपर क्लीन आणि रॉकेट क्लीनर सारखी ‘ऑप्टिमायझिंग’ आणि ‘क्लीनिंग’ ॲप्स कधीही इन्स्टॉल करू नका.
2. तसेच विश्वसनीय ॲप स्रोतावरून कोणतेही ॲप डाउनलोड (Play Store App Download Alert) करण्यापूर्वी अभिप्राय किंवा रिव्ह्युव तपासा.
3. ॲप डाउनलोड करण्यापूर्वी, ॲपच्या डाउनलोडची संख्या तपासा. नवीन ॲपसाठी मोठ्या संख्येने डाउनलोडचा दावा करणे हे एक धोक्याचे चिन्ह आहे.

4. डेव्हलपर गुगल प्ले स्टोर त्याच्या वर्णनामध्ये ॲप्सच्या सर्व तपशीलांचा उल्लेख करतात. ज्यात अप्ससाठी आवश्यक असलेल्या परवानग्या समाविष्ट आहेत.
5. ॲप डेव्हलपर विषयी जाणून घ्या, त्यांनी इतर कोणते ॲप बनवले आहेत का ते पाहा, बनवले असतील तर त्यांचे रिव्ह्युव देखील पाहा.

Play Store App Download Alert l दरम्यान, तुम्ही जर अजूनही अँड्राइड फोनचा वापर करत असाल तर कोणतेही अ‍ॅप डाउनलोड करताना सावध राहणे गरजेचे आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सांगायचे झाले तर अँड्राइड अ‍ॅप्समध्ये मॅलवेअर आढळत आहे. हे तुमच्या स्मार्टफोन मध्ये आढळ्यास तुमचे बँक खाते रिकामे होऊ शकते. त्यामुळे कोणताही स्टोरेवरून अँप डाउनलोड करतांना सावधान गिरी पाळली पाहिजे असे सांगण्यात येते.

महत्वाच्या घडामोडी :

Goa हत्याकांड! महिला CEO कडून पोटच्या मुलाची हत्या; पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा

Lakshadweep Island Tourism l निसर्गाचा मनमोहक आनंद घेयचा असेल तर लक्षद्वीप बेटाला भेट द्या!

Mohammed shami | “PM मोदी आपल्या देशाला…”, मालदीव वादावर शमीचं मोठं विधान

Ram Mandir Inauguration | उत्तर प्रदेश सरकारची विशेष तयारी; CM योगींची मोठी घोषणा

Animal Movie | महिलांवरील अत्याचार दाखवणारेच चित्रपट लोकांना आवडतात; कंगनाचा संताप