Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Rain Alert l गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील हवामानात बदल होताना दिसत आहेत. काही ठिकाणी गुलाबी थंडी तर काही ठिकाणी अवकाळी पाऊस (Rain Alert) धुमाकूळ घालत आहे. अशातच काल राज्यातील अहमदनगर, पुणे, कोकण, जळगाव या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे. हवामानात बदल होत असल्याने पुण्यामध्ये कमाल तापमानाचा पारा 4 अंश सेल्सिअसने कमी होऊन 24.8 अंश सेल्सिअस नोंदवला आहे.

पुण्यामध्ये थंडी (Rain Alert) वाढण्याची शक्यता :

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुण्यामध्ये थंडी (Rain Alert) वाढण्याची शक्यता आहे. कारण मंगळवारी पुण्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने कमाल तापमानात घसरण झाली आहे.

त्यामुळे पुणेकरांना आता भरदिवसा देखील स्वेटर, कानटोपी व उबदार कपडे परिधान करावे लागणार आहेत. तसेच हवामानात बदल झाल्याने पुण्यात धुक्याची चादर देखील पहाटेच्या वेळी पाहायला मिळाली आहे.

Rain Aleart l पुण्यातील या भागात पावसाने लावली हजेरी :

पुण्यात काल (Rain Aleart) पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची ऐन थंडीत धावपळ उइडली आहे. पुण्यातील मध्य वस्तीतील पेठांसह सिंहगड रस्ता, कात्रज, वारजे, पाषाण, बाणेर, मगरपट्टा, फुरसुंगी, खरेदी, वाघोली या भागांत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गार हवा वाहू लागली आहे.

Rain Alert l अवकाळी पाऊस पाडण्यामागचे कारण काय?

– वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे बाष्पयुक्त वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात थंड वर वाहत आहे.
बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्पयुक्त वारे मध्य भारताच्या दिशेने वाहत असल्याने महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे.
– तसेच पुढील दोन दिवस राज्यातील काही ठिकाणी पावसाची पडण्याची शक्यता आहे.

पुण्यातील कोणत्या भागात किती पाऊस पडला? (Rain Alert) :

शिवाजीनगर – 1.6
पाषाण – 2
लोहगाव – 3.6
लवळे – 4.5
मगरपट्टा – 13
चिंचवड – 6

हवामान खात्याने पुढील दोन दिवस राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पिकांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच बदलत्या वातावरणामुळे आरोग्याची देखील काळजी घेणे गरजेचे आहे.

महत्वाच्या घडामोडी :

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

Renault Kiger & Triber New Range 2024 l रेनॉल्ट इंडिया कंपनी पुढील 3 वर्षात सादर करणार हे 5 जबरदस्त व्हेरियंट!

Rohit Sharma ला खुनावतोय ‘विराट’ विक्रम; धोनीलाही मागं टाकण्याची सुवर्णसंधी

Online Electricity Bill l ग्राहकांनो…अशाप्रकारे घरबसल्या लाईटबिल भरा तेही अगदी काही मिनिटांत

Play Store App Download Alert l सावधान! Play Store वरून कोणतेही ॲप डाउनलोड करताय…? मग त्याआधी या गोष्टी ठेवा लक्षात