MLA Disqualification Case | वकील असिम सरोदे यांचा अपात्रतेच्या निकालापूर्वी गंभीर सवाल; म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

MLA Disqualification Case | शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय आज दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज (10 जानेवारी) दुपारी चार वाजता याचा निर्णय देणार आहेत. या पार्श्वभूमीवरच ॲड. असिम सरोदे (Asim Sarode) यांनी यांनी फेसबुक पोस्ट करत अपात्रतेबाबत (MLA Disqualification Case) आज निर्णय होणार का, असा मोठा सवाल केला आहे.

Asim Sarode यांची पोस्ट|

अपात्रतेबाबत काय निर्णय होणार? असा प्रश्न सर्वांना आहे मात्र आज निर्णय (MLA Disqualification Case) होणार का? असा प्रश्न मला पडतोय कारण अजूनही प्रकरणातील वकील म्हणून मला किंवा इतर वकिलांना Maharashtra Legislative Assembly सचिव यांच्याकडून इमेल आलेला नाही की राहुल नार्वेकर किती वाजता निर्णय जाहीर करणार?


कदाचित अगदी वेळेआधी कळतील की किती वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात जमायचं आहे? पण जर 400 ते 500 पानांचा निर्णय तयार आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निर्णय देणे आवश्यक आहेच तर किती वाजता निर्णय जाहीर करणार हे कळवायला इतका उशीर का?, असा सवाल असीम सरोदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे केला आहे. सरोदे यांच्या पोस्टमुळे आता निर्णय होईल की नाही, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

” माझा निर्णय कायद्याला धरूनच…”

आमदार अपात्रतेच्या निर्णयाची (MLA Disqualification Case) शिंदे गटासोबतच ठाकरे गटाला आतुरतेने प्रतिक्षा आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवरच काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यादेखील उपस्थित होत्या. त्यामुळे या बैठकीत निकालाबाबत महत्वपूर्ण चर्चा झाल्याचं म्हटलं जात आहे.

दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणात कुठेही कायद्याच्या तरतुदींची मोडतोड झालेली नसून माझा निर्णय कायद्याला धरूनच असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सर्वांनाच या निकालाची ओढ लागली आहे.

आज सायंकाळी चार वाजता राहुल नार्वेकर निकालाचे (MLA Disqualification Case) वाचन करणार आहेत. एकूण 500 पानांच्या निकाल पत्रातून महत्त्वाचे मुद्दे घेऊन एक सारांश निकाल ते वाचून दाखवतील. या निकालाची मूळ प्रत दोन्ही गटाच्या वकिलांना दिली जाणार आहे. मात्र वकील असीम सरोदे यांच्या पोस्टमुळे निर्णय आज लागेल की नाही, यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

News Title- Shivsena MLA Disqualification Case Hearing

महत्त्वाच्या बातम्या-  

Mla Disqualification | आमदार अपात्रतेबाबत संजय राऊतांचा सर्वात मोठा दावा!

Rain Alert l पुणेकरांनो… कोणत्या भागात किती पाऊस पडला पहा क्लिकवर

Ira khan | आयरा खान आणि नुपूर शिखरेचा शाही विवाह; उदयपूरमध्ये दुसऱ्यांदा करणार लग्न

Renault Kiger & Triber New Range 2024 l रेनॉल्ट इंडिया कंपनी पुढील 3 वर्षात सादर करणार हे 5 जबरदस्त व्हेरियंट!

Rohit Sharma ला खुनावतोय ‘विराट’ विक्रम; धोनीलाही मागं टाकण्याची सुवर्णसंधी